WATCH ! ​‘गॉड, सेक्स अ‍ॅण्ड ट्रूथ’चा ट्रेलर आऊट; पोर्न स्टार मिया मल्कोवासमोर सनी लिओनी फेल !!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2018 06:39 AM2018-01-16T06:39:10+5:302018-01-16T12:09:10+5:30

अमेरिकन पोर्न स्टार मिया मल्कोवा स्टार ‘गॉड, सेक्स अ‍ॅण्ड ट्रूथ’ या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला. दिग्दर्शक राम गोपाल वर्मा दिग्दर्शित या चित्रपटाची रिलीज डेटही जारी करण्यात आली आहे. येत्या २६ जानेवारीला हा चित्रपट रिलीज होणार आहे.

WATCH! Trailer out of 'God, Sex and Truth'; Porn star Mia Malkovasamor Sunny Leone Fell !! | WATCH ! ​‘गॉड, सेक्स अ‍ॅण्ड ट्रूथ’चा ट्रेलर आऊट; पोर्न स्टार मिया मल्कोवासमोर सनी लिओनी फेल !!

WATCH ! ​‘गॉड, सेक्स अ‍ॅण्ड ट्रूथ’चा ट्रेलर आऊट; पोर्न स्टार मिया मल्कोवासमोर सनी लिओनी फेल !!

googlenewsNext
ेरिकन पोर्न स्टार मिया मल्कोवा स्टार ‘गॉड, सेक्स अ‍ॅण्ड ट्रूथ’ या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला. दिग्दर्शक राम गोपाल वर्मा दिग्दर्शित या चित्रपटाची रिलीज डेटही जारी करण्यात आली आहे. येत्या २६ जानेवारीला हा चित्रपट रिलीज होणार आहे.
  बॉलिवूड इंडस्ट्रीत एन्ट्री करण्यासाठी सज्ज असलेली पोर्न स्टार मिया मल्कोवा या ट्रेलरमध्ये अतिशय बोल्ड अंदाजात दिसतेय. महान विचारवंतांच्या शब्दांत महिलेच्या लैंगिक भावना मांडण्याचा एक आगळा वेगळा प्रयत्न या ट्रेलरमधून करण्यात आला आहे. महान सायकॉलॉजिस्ट सिगमंड फ्रायड याच्या ‘Sex is and will be the biggest thing of all time’ या कथनाने या ट्रेलरची सुरूवात होते. केवळ सिगमंड फ्रायडचं नाही तर हेन्री मिलर, वुडी एलन आणि मर्लिन मुन्रो यासारख्या महान व्यक्तिंचे कोट या ट्रेलरमध्ये दिसतात. ट्रेलरमध्ये मिया एका महिलेच्या आयुष्याशी संबंधित एका एका रहस्यावरून पडदा उठवताना दाखवले गेले आहे. व्हिज्युअल , कोट्स याशिवाय याचे संगीतही आकर्षक आहे. शास्त्रीय संगीताचा आधार यासाठी घेण्यात आला आहे. एकंदर काय तर चित्रपटाचा हा ट्रेलर उत्सुकता वाढवणारा आहे. या ट्रेलरला पे्रक्षकांचाही मोठा प्रतिसाद मिळताना दिसतेय. अनेक लोकांनी या मुद्यावर चित्रपट बनवल्याबद्दल राम गोपाल वर्मा यांचे अभिनंदन केले आहे.



येत्या ‘२५ तारखेला संजय लीला भन्साळींचा ‘पद्मावत’ रिलीज होतो आहे. याचदिवशी अक्षय कुमारचा ‘पॅडमॅन’ हा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे आणि याच्या नेमक्या दुसºया दिवशी राम गोपाल वर्मांचा ‘गॉड, सेक्स अ‍ॅण्ड ट्रूथ’ हा सिनेमा प्रदर्शित होतो आहे.  दोन मोठ्या चित्रपटांच्याच्या शर्यतीत हा चित्रपट किती मोठा पल्ला गाठतो, ते पाहणे इंटरेस्टिंग ठरणार आहे.

ALSO READ : सनी लिओनीनंतर ‘ही’ पोर्न स्टार करणार बॉलिवूडमध्ये एंट्री; रामगोपाल वर्मा करणार लॉन्च!

२६ वर्षीय मिया मल्कोवा  पोर्न इंडस्ट्रीत येण्याअगोदर ती चॅन मॅकडोनाल्ड आणि सिज्लर या रेस्टॉरंटमध्ये काम करीत होती. पुढे २०१२ मध्ये तिने पोर्न इंडस्ट्री ज्वाइन केली. तिची शालेय मैत्रीण आणि अ‍ॅडल्ट चित्रपटांमधील अभिनेत्री नताशा मल्कोवा हिने तिला इंडस्ट्रीत ओळख मिळवून दिली. तिच्या खºया नावाबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. परंतु असे म्हटले जाते की, मिया मल्कोवा हे तिचे पोर्न इंडस्ट्रीतील नाव आहे. कारण या नावात रशियन आणि युरोपियन मॉडेलच्या नावांची फिलिंग येते.  a

Web Title: WATCH! Trailer out of 'God, Sex and Truth'; Porn star Mia Malkovasamor Sunny Leone Fell !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.