​नव्या चित्रपटाची नाही तर प्रभास करतोय निवृत्तीची प्रतीक्षा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2018 16:03 IST2018-01-03T10:28:41+5:302018-01-03T16:03:14+5:30

अभिनेता प्रभास सध्या केवळ साऊथचाच नाही तर भारतीय सिनेसृष्टीचा सुपरस्टार बनलाय. पण कदाचित आपले हे यश प्रभास फार गंभीरपणे ...

Waiting for retirement, not for a new movie! | ​नव्या चित्रपटाची नाही तर प्रभास करतोय निवृत्तीची प्रतीक्षा!

​नव्या चित्रपटाची नाही तर प्रभास करतोय निवृत्तीची प्रतीक्षा!

िनेता प्रभास सध्या केवळ साऊथचाच नाही तर भारतीय सिनेसृष्टीचा सुपरस्टार बनलाय. पण कदाचित आपले हे यश प्रभास फार गंभीरपणे घेत नाहीये, असेच दिसतेय. होय, आपल्या करिअरविषयी विचार करण्याऐवजी प्रभासने आत्तापासूनच रिटायरमेंटचे प्लानिंग सुरु केले आहे.
होय, अलीकडे एका मुलाखतीत प्रभासने त्याचे रिटायरमेंट प्लानिंग सांगितले. चित्रपटातून मन भरलेच तर माझ्याकडे प्लान तयार आहे. चित्रपटांतून निवृत्त झाल्यानंतर मी एक फार्म हाऊस बनवणार आणि मित्रांसोबत मिळून फिशिंग बिझनेस करणार. हैदराबादेबाहेर प्रॉपर्टी खरेदी करून आपली ही इच्छा पूर्ण करण्याचा माझा इरादा आहे. पण पुढे काय होणार, हे कुणी पाहिले, असे प्रभास यावेळी म्हणाला. 
अर्थात यावेळी प्रभासने त्याच्या बॉलिवूड डेब्यूचे संकेतही दिलेत. मी खूप हिंदी चित्रपट पाहतो. मी हैदराबादेत राहतो. इथले ६० टक्के लोक हिंदी बोलतात. त्यामुळे हिंदी भाषा मला कधीच परकी वाटली नाही. बॉलिवूडच्या अनेक चांगल्या आॅफर्स मला मिळत आहेत. तीन वर्षांपूर्वी मी बॉलिवूडच्या एका स्क्रिप्टला होकार दिला होता. ती एक प्रेमकथा होती. ‘साहो’नंतर मी हा चित्रपट करणार आहे, असे प्रभास यावेळी सांगितले.  एकंदर काय तर एकाच वेळी बॉलिवूड डेब्यू आणि रिटायरमेंटवर प्रभास बोलला आहे. पण चाहत्यांचे विचाराल तर प्रभासला आणखी बराच मोठा पल्ला गाठायचाय. चित्रपटसृष्टीतील त्याचा प्रवास अखंड चालावा, असेच चाहत्यांचे मत आहे. किंबहुना तशा शुभेच्छा आहेत. किमान चाहत्यांची ही इच्छा लक्षात घेवून तरी प्रभासने रिटायरमेंटचा प्लान डोक्यातून पूर्णपणे काढून टाकायला हवा. होय ना?

ALSO READ : ​प्रभासच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज! बॉलिवूड डेब्यूसाठी ‘बाहुबली’ सज्ज!!

 तूर्तास प्रभास आपल्या ‘साहो’ चित्रपटात बिझी आहे. प्रभासचा हा चित्रपट तामिळ, तेलगू आणि हिंदीत तयार होत आहे. या चित्रपटात श्रद्धा कपूर, चंकी पांडे, जॅकी श्रॉफ, नील नितीन मुकेश यासारख्या बॉलिवूड स्टार्सची वर्णी लागली आहे. 

Web Title: Waiting for retirement, not for a new movie!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.