विराट कोहलीने म्हटले, ‘अनुष्का माझी कॅप्टन’, पाहा व्हिडीओ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2018 20:53 IST2018-05-20T15:19:17+5:302018-05-20T20:53:32+5:30
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आयपीएलमध्ये तिचा पती विराट कोहली आणि आरसीबीच्या टीमला सपोर्ट करताना स्टेडियममध्ये बघावयास मिळाली. विशेष म्हणजे ...

विराट कोहलीने म्हटले, ‘अनुष्का माझी कॅप्टन’, पाहा व्हिडीओ!
ब लिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आयपीएलमध्ये तिचा पती विराट कोहली आणि आरसीबीच्या टीमला सपोर्ट करताना स्टेडियममध्ये बघावयास मिळाली. विशेष म्हणजे जेव्हा-जेव्हा तिला स्टेडियममध्ये पोहोचणे शक्य झाले नाही, तेव्हा-तेव्हा तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून आरसीबीला चीयर केले. दरम्यान, पत्नी अनुष्काशी संबंधित विराटचा एक व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत असून, त्यामध्ये तो पत्नी अनुष्काचे गोडवे गाताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये विराटने मान्य केले की, मी जरी फील्डमध्ये कॅप्टन असलो तरी, ‘आॅफ फील्डमध्ये माझी कॅप्टन अनुष्का आहे.’ कोहलीचा हा मुलाखतीचा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत असून, चाहत्यांकडूनही त्यास मोठ्या प्रमाणात पसंत केले जात आहे.
या मुलाखतीत विराटने अनुष्काविषयी म्हटले की, ‘ती देशात असो वा बाहेर मॅच नक्की बघत असते. अनुष्का मैदानातील खेळाडूंच्या भावना पूर्णपणे समजून घेते. तिच्या मनात या खेळाविषयी खूप आदर आणि उत्सुकता आहे. कारण ती या खेळाविषयी खूप जवळून जाणून आहे. जेव्हा विराटला विचारण्यात आले की, ‘आॅफ फील्ड कॅप्टन कोण आहे?’ तेव्हा तो काही वेळ शांत राहिला अन् नंतर उत्तरात त्याने अनुष्काचे नाव घेतले. त्याने म्हटले की, ‘ती नेहमीच सकारात्मक विचार करीत असते. त्यामुळे ती नेहमीच योग्य निर्णय घेते. त्यामुळेच ती माझी ‘आॅफ फील्ड कॅप्टन’ आहे.
https://twitter.com/AnushkaNews/status/997806887545507841
दरम्यान, अनुष्का शर्मा सध्या अभिनेता शाहरूख खानसोबत ‘झीरो’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वीच अनुष्काने तिच्या बर्थडेचा विराटसोबतचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, ‘बेस्ट बर्थ डे, जगातील सर्वांत दयाळू, बहादूर आणि सर्वांत चांगल्या व्यक्तीसोबत.’ दरम्यान, विराटची ही मुलाखत सध्या सर्वत्र व्हायरल होत असून, चाहत्यांकडून ती पसंतही केली जात आहे.

“... She (@AnushkaSharma) is ofcourse (the captain off field), she takes all the right decisions in life... She is totally my strength and she keeps me positive all the time and that's what you want with your life partner so I'm very grateful” - @imVkohli