व्हायरल गर्ल प्रिया प्रकाशचा आणखी एक व्हिडीओ होतोय व्हायरल, सिम्पल अदांनी चाहते घायाळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2018 17:03 IST2018-03-24T11:32:41+5:302018-03-24T17:03:29+5:30

प्रिया प्रकाश वॉरियरचा कुठलाही व्हिडीओ अथवा फोटो वाºयासारखा व्हायरल होतो. तिचा आणखी एक व्हिडीओ समोर आला असून, त्यामध्ये तिचा सिम्पल अंदाज बघावयास मिळत आहे.

Viral Girl Priya Prakash is another video of Viral, Simples Ada fans wounded! | व्हायरल गर्ल प्रिया प्रकाशचा आणखी एक व्हिडीओ होतोय व्हायरल, सिम्पल अदांनी चाहते घायाळ!

व्हायरल गर्ल प्रिया प्रकाशचा आणखी एक व्हिडीओ होतोय व्हायरल, सिम्पल अदांनी चाहते घायाळ!

ल्या काही दिवसांपासून इंटरनेटवर वाºयासारखी व्हायरल होत असलेली मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वॉरियरने कोट्यवधी तरुणांच्या हृदयावर कब्जा केला आहे. कारण तिचा कुठलाही व्हिडीओ अथवा फोटो असा काही व्हायरल होतो की, त्यास काही मिनिटांतच हजारो लाइक्स मिळतात. त्यामुळेच प्रियाला ‘व्हायरल गर्ल’ या नावानेही आता ओळखले जात आहे. आता प्रियाचा आणखी एक व्हिडीओ समोर आला असून, त्यामध्ये ती अतिशय सिम्पल लूकमध्ये दिसत आहे. मात्र तिच्या चेहºयावरील सोज्वळपणा नेटिझन्सना असा काही भावत आहे की, पुन्हा एकदा ती या व्हिडीओमुळे व्हायरल होत आहे. 

प्रियाचा हा व्हिडीओ तिच्याच एका चाहत्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये प्रिया पिंक कलरचा टॉप आणि ब्लॅक कलरच्या पॅण्टमध्ये दिसत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार प्रियाने तिच्या अशाप्रकारच्या व्हिडीओच्या माध्यमातूनच इन्स्टाग्रामवर सर्वाधिक कमाई करणाºया सेलिब्रिटींना मागे सोडले आहे. सध्या प्रियाचे इन्स्टाग्रामवर ५० लाखांपेक्षा अधिक फॉलोअर्स झाले आहेत. एवढ्या मोठ्या संख्येत फॉलोअर्स झाल्यामुळे प्रियाला अनेक मोठ्या ब्रॅण्डच्या आॅफर्स मिळत आहेत. इंडिया टीव्हीच्या एका रिपोर्टनुसार प्रिया प्रकाश एका इन्स्टाग्राम पोस्टसाठी आठ लाख रूपये चार्ज करते. 

या व्यतिरिक्त बरेचसे ब्रॅण्ड प्रिया प्रकाशसोबत जाहिरात करण्यास उत्सुक आहेत. प्रियाची लोकप्रियता एवढी वाढत आहे की, गुगल सर्चमध्ये तिने हॉट अभिनेत्री सनी लिओनी आणि मस्तानी दीपिका पादुकोणलाही पिछाडीवर सोडले आहे. एकाच दिवसात तिचे सहा लाखांपेक्षा अधिक फॉलोअर बनले होते. प्रियाने फॉलोअरच्या बाबतीत अमेरिकन रिअ‍ॅल्टी टीव्ही स्टार कायली जेनर आणि फुटबॉल स्टार क्रिस्टियानो रोनोल्डो यांची बरोबरी केली आहे. सध्या प्रिया तिचे शिक्षण पूर्ण करीत असून, तिला अभिनयाच्या अनेक आॅफर्स येत आहेत. बॉलिवूडमधीलही काही निर्माते तिच्यासोबत चित्रपट करण्यास उत्सुकत आहेत.

Web Title: Viral Girl Priya Prakash is another video of Viral, Simples Ada fans wounded!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.