‘हा’ खलनायक आहे बॉलिवूडच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याचा सख्खा भाऊ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2018 14:52 IST2018-04-29T09:22:19+5:302018-04-29T14:52:19+5:30

बॉलिवूडमध्ये बरेचसे कलाकार येतात अन् जातात. यातील काही हिट होतात तर काही फ्लॉप होतात. यातीलच एक नाव अभिनेता चंद्रचूड ...

'This' is a villain, the famous brother of this famous Bollywood actor! | ‘हा’ खलनायक आहे बॉलिवूडच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याचा सख्खा भाऊ!

‘हा’ खलनायक आहे बॉलिवूडच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याचा सख्खा भाऊ!

लिवूडमध्ये बरेचसे कलाकार येतात अन् जातात. यातील काही हिट होतात तर काही फ्लॉप होतात. यातीलच एक नाव अभिनेता चंद्रचूड सिंग याचे आहे. फिल्मी जगतातून हे नाव खूपच लवकर गायब झाले. मात्र त्याच्या लहान भावाबद्दल सांगायचे झाल्यास तो आजही हिंदी आणि तेलगू चित्रपटांमध्ये आपले खलनायकाचे रूप आजमावत आहे. होय, आम्ही अभिनेता अभिमन्यू याच्याविषयी सांगत आहोत. २००१ मध्ये आलेल्या ‘अक्स’ या चित्रपटातून अभिमन्यू याने पडद्यावर एंट्री केली. 



२००९ मध्ये त्याला ‘गुलाल’ या चित्रपटातही बघण्यात आले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग कश्यप यांनी केले होते. अभिमन्यूला त्याच्या अभिनयाच्या जोरावर २०१० मध्ये स्टारडस्ट अवॉर्डनेही सन्मानित करण्यात आले. २०१० मध्ये आलेल्या ‘रक्तचरित्र’मध्येही अभिमन्यूच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक केले गेले. या चित्रपटाचे दिग्दर्शन राम गोपाल वर्मा यांनी केले होते. अभिमन्यूने केवळ बॉलिवूडमध्येच नव्हे तर टॉलीवूडमध्येही आपल्या खलनायकी रूपाची छाप सोडली. त्याने ‘दस का दम’ या तामीळ सुपरहिट चित्रपटात निगेटिव्ह भूमिका साकारली होती. 



साउथमध्ये अभिमन्यूने एकापेक्षा एक निगेटीव्ह भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे त्याला २०१३ मध्ये एसआयआयएमए अवॉर्डने सन्मानित करण्यात आले होते. त्याला हा अवॉर्ड २०१२ मध्ये आलेल्या ‘गब्बर सिंग’ या चित्रपटासाठी देण्यात आला होता. अभिमन्यूने हिंदी आणि तेलगू इंडस्ट्रीत त्याच्या १७ वर्षांच्या करिअरमध्ये तब्बल ३५ चित्रपटांमध्ये काम केले होते. ज्यामध्ये ‘रामलीला’सारख्या सुपरहिट चित्रपटाचा समावेश आहे. तसेच अभिमन्यूने टीव्ही मालिकांमध्येही आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. 



सध्या अभिमन्यू ‘गदर एक प्रेमकथा’ या ब्लॉकबस्टर चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांच्या मुलाच्या आगामी ‘जीनियस’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. 

Web Title: 'This' is a villain, the famous brother of this famous Bollywood actor!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.