Vikram Bhatt Wedding: बाबो..! वयाच्या ५२व्या वर्षी विक्रम भट यांनी गुपचूप केलं लग्न, जाणून घ्या कोण आहे त्यांची पत्नी?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 06:50 PM2021-10-06T18:50:02+5:302021-10-06T18:50:31+5:30

Vikram Bhatt Wedding: सध्या विक्रम भट आणि त्यांच्या पत्नीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

Vikram Bhatt Wedding: Babo ..! Vikram Bhatt secretly got married at the age of 52. Find out who his wife is. | Vikram Bhatt Wedding: बाबो..! वयाच्या ५२व्या वर्षी विक्रम भट यांनी गुपचूप केलं लग्न, जाणून घ्या कोण आहे त्यांची पत्नी?

Vikram Bhatt Wedding: बाबो..! वयाच्या ५२व्या वर्षी विक्रम भट यांनी गुपचूप केलं लग्न, जाणून घ्या कोण आहे त्यांची पत्नी?

googlenewsNext

बॉलिवूड निर्माता आणि दिग्दर्शक विक्रम भट चाहत्यांमध्ये खूपच लोकप्रिय आहेत. आज विक्रम भट त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. असे वृत्त समोर आले आहे की विक्रम भट यांनी गुपचूप लग्न केले आहे. विक्रम यांनी आपल्या लग्नाचे वृत्त कोणाला समजू दिले नव्हते. अशात आता विक्रम भट (Vikram Bhatt) आणि त्यांच्या पत्नीचा देखील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. विक्रम भटने मागील वर्षी सीक्रेट लग्न केले होते. त्यांनी त्यांच्या लग्नाबद्दल कुणालाच हिंट लागू दिली नाही.


वृत्तानुसार विक्रम भट यांनी श्वेतांबरी सोनीसोबत लग्न केले आहे. आता जवळपास वर्षभरानंतर विक्रम भट यांच्या लग्नाचा खुलासा चाहत्यांसमोर झाला आहे. टाइम्सच्या रिपोर्टनुसार, विक्रम भट यांनी अद्याप लग्नाच्या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. त्यामुळे सर्वांचे लक्ष विक्रम भट त्यांच्या लग्नाचा खुलासा कधी करतात याकडे लागले आहे. यापूर्वी विक्रम भट यांचे पहिले लग्न अदिती भट यांच्यासोबत झाले होते. विक्रम आणि आदिती यांचे नाते बराच काळ चालले आणि त्यानंतर त्यांनी १९९८ साली विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. विक्रम भट आणि अदिती भट यांना एक मुलगी आहे जिचे नाव कृष्णा आहे.


विक्रम भट यांचे अफेयर लाइफ खूप चर्चेत आले होते. विक्रम भट यांचे बऱ्याच अभिनेत्रीसोबत रिलेशन होते, अशी चर्चा होती. विक्रम भट यांनी अभिनेत्री सुष्मिता सेन आणि अमिषा पटेलला डेट केले आहे. विक्रम आणि सुष्मिता सेन लिव्ह इन मध्ये राहत असल्याचे वृत्तदेखील समोर आले होते. काही कालावधीनंतर त्यांचे मार्ग वेगळे झाले.

महेश भट यांनी केला खुलासा
टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्ट्सनुसार, महेश भट यांनी खुलासा केला की विक्रम भट यांनी मागील वर्षी सप्टेंबरमध्ये लॉकडाउन दरम्यान लग्न झाले होते. त्यांनी मला फोन केला आणि म्हणाले की, बॉस माझे लग्न होत आहे आणि कोव्हिडच्या परिस्थितीत लग्न समारंभात आमंत्रित केल्या जाणाऱ्या लोकांच्या संख्येवर प्रतिबंध आहे आणि तुमच्या स्वास्थासंदर्भात चिंता लक्षात घेता मी तुमच्यावर दबाव टाकणार नाही.

Web Title: Vikram Bhatt Wedding: Babo ..! Vikram Bhatt secretly got married at the age of 52. Find out who his wife is.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.