VIDEO : विजय देवरकोंडानं मध्यरात्री केलं असं काही..., सामंथाला अश्रू अनावर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 03:24 PM2022-04-29T15:24:15+5:302022-04-29T15:27:35+5:30

Vijay Deverakonda Samantha Ruth Prabhu Video : साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडानं सामंथाला जबरदस्त सरप्राईज दिलं. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

Vijay Deverakonda Pranks Samantha Ruth Prabhu on her birthday Surprises actress | VIDEO : विजय देवरकोंडानं मध्यरात्री केलं असं काही..., सामंथाला अश्रू अनावर

VIDEO : विजय देवरकोंडानं मध्यरात्री केलं असं काही..., सामंथाला अश्रू अनावर

googlenewsNext

Vijay Deverakonda Surprises Samantha Ruth Prabhu : साऊथ सुपरस्टार सामंथा रूथ प्रभुने (Samantha Ruth Prabhu ) काल 28 एप्रिलला वाढदिवस साजरा केला. अर्थात तिचा बर्थ डे कामात गेला. एका चित्रपटाच्या शूटींगमध्ये ती बिझी दिसली. पण कितीही बिझी असलात म्हणून बर्थ डे सेलिब्रेशन होणार नाही, असं कसं? तर 27 तारखेला 12 च्या ठोक्याला सामंथासाठी खास बर्थ डे सरप्राइज प्लान करण्यात आलं. साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) याने सामंथाला जबरदस्त सरप्राईज दिलं. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

विजय देवरकोंडानं सिनेमाच्या निर्मांत्यासोबत मिळून एक जबरदस्त प्लान केला. यासाठी एक खास फेक लव्ह सीन लिहिण्यात आला. मग फेक रिहर्सल पार पडलं आणि नंतर फेक शूटींगही सुरू झालं. सामंथाला जराही संशय आला नाही.

ती कॅमेऱ्यापुढे उभी झाली. व्हिडीओत सामंथा विजय देवरकोंडाच्या जवळ येते व तिचा डायलॉग म्हणते. यानंतर विजय देवरकोंडाची डायलॉग म्हणायची वेळ येते तसा तो फक्त ‘सामंथा’ म्हणतो. आपलं नाव ऐकताच सामंथा हसू लागले.  विजय सिनेमातील तिचं नाव विसरून तिचं खरं नाव घेत असल्याचं तिला वाटतं. यानंतर लगेच, विजय देवरकोंडा  त्याचं वाक्य पूर्ण करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो.  हे सरप्राईज पाहून सामंथा दंग होते.   सेटवरील सर्व लोक तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओत सामंथा काहीशी इमोशनल झाल्याचंही दिसतंय.


 
विजय देवरकोंडा आणि सामंथा रुथ प्रभूचा चित्रपट काश्मीर बेस्ट रोमँटिक स्टोरी आहे. यात विजय देवरकोंडा आर्मी आॅफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. तर समंथा काश्मिरी महिलेच्या भूमिकेत दिसणार आहे. शिव निर्वाण यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाचं नाव अद्याप गुलदस्त्यात आहे. 
 
साऊथ अभिनेता नागा चैतन्य याच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर अभिनेत्री प्रचंड चर्चेत आली होती. पण आता सामंथा जुनं सगळं विसरून आपल्या कामात बिझी झाली आहे. 

Web Title: Vijay Deverakonda Pranks Samantha Ruth Prabhu on her birthday Surprises actress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.