​विद्या म्हणते मी निर्दोष!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2016 19:23 IST2016-10-22T18:49:49+5:302016-10-22T19:23:57+5:30

विद्या बालन ‘वाँटेड’ असल्याचे पोस्टर नुकतेच चर्चेत होते. तिच्या आगामी ‘कहानी २’ या चित्रपटाचे हे पोस्टर असल्याचे सांगण्यात आले ...

Vidya says I am innocent! | ​विद्या म्हणते मी निर्दोष!

​विद्या म्हणते मी निर्दोष!

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">विद्या बालन ‘वाँटेड’ असल्याचे पोस्टर नुकतेच चर्चेत होते. तिच्या आगामी ‘कहानी २’ या चित्रपटाचे हे पोस्टर असल्याचे सांगण्यात आले होते. विद्याने ट्विट करीत आपण ‘वाँटेड’ नसल्याचे जाहीर केले. मी कुणाचाही खून किंवा अपहरण केले नसल्याचे तिने म्हटले आहे.

जोपर्यंत माझ्यावरील गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत मी निर्दोष आहे, असेही तिने आपल्या ट्विटमध्ये लिहिलेय. यासंदर्भात तिने व्हिडीओ पोस्ट केला आहे.  हा व्हिडीओ ‘कहानी २’ या चित्रपटाचा टीझर आहे. २०१२ साली आलेल्या ‘कहानी’ या चित्रपटाचा हा सिक्वल असून, याचे दिग्दर्शन सुजोय घोष यांनी केले आहे. या चित्रपटात ती दुर्र्गा राणी सिंग या भूमिकेत दिसणार आहे. कहानी २ मध्ये अर्जुन रामपालची देखील महत्त्वाची भूमिका आहे. 

पूर्वी आलेल्या कहानी या चित्रपटात विद्या आपल्या नवºयाच्या खुनाचा बदला घेताना दिसली होती. यासाठी पोलिसांचा तिने पुरेपूर वापर करून घेतला होता. हा चित्रपट हिट ठरला.  मागीलवर्षी विद्या ‘हमारी अधूरी कहानी’ या चित्रपटात दिसली होती, मात्र या चित्रपटाला बॉक्स आॅफिसवर काही खास करता आले नाही. आता विद्या पुन्हा ‘कहानी २’ या चित्रपटात दिसणार आहे. काही कारणांनी या चित्रपटाची रिलीज डेट एक आठवडा पुढे ढकलण्यात आली आहे. बॉक्स आॅफिसवर हिट ठरलेल्या चित्रपटांमधील तिच्या अभिनयाची चांगलीच प्रशंसा झाली.

Innocent until ...... proven guilty ?!!

Web Title: Vidya says I am innocent!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.