‘बाहुबली २’ चा व्हिडीओ लीक : ग्राफिक डिझायनरला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2016 17:45 IST2016-11-23T17:45:42+5:302016-11-23T17:45:42+5:30
एस.एस. राजमौली यांचा बहुचर्चित चित्रपट ‘बाहुबली २’चा दोन मिनिटांचा एक व्हिडिओ लीक झाल्या प्रकरणी या चित्रपटाच्या ग्राफिक डिझायनरला अटक ...
.jpg)
‘बाहुबली २’ चा व्हिडीओ लीक : ग्राफिक डिझायनरला अटक
‘बाहुबली २’च्या कथित लिक प्रकरणी निर्माता एस.एस. राजमौली यांनी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी हैदराबाद येथील अन्नपूर्णा स्टुडीओच्या एका कर्मचाºयाला अटक केली आहे. हैदराबाद पोलिसांनी सेक्यरिटी फिचर्सचा वापर करून लीक करणाºया व्यक्तीची ओळख करून त्याला अटक केली आहे. अटक झालेला कर्मचारी पोस्ट प्रोडक्शनचे काम करीत असल्याचे सांगण्यात येते. त्याने सुमारे नऊ मिनीटांचा व्हिडीओ सोशल मीडियावर लीक केला होता.
‘बाहुबली २’चा महत्त्वाचा भाग लीक झाल्याची बातमी वाºयासारखी पसरली. निर्मात्यांनी लगेच हे कंटेंट बॅन करायला लावले असून आता या व्हिडीचे प्रसार थांबला आहे. या लीक झालेल्या व्हिडीओमध्ये शूटिंगनंतर व्हीएफएक्सवर काम होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये प्रभास व अनुषा आपल्या सैन्यासोबत सीमेचे रक्षण करताना दिसत आहेत.
‘बाहुबली’ या चित्रपटाच्या पहिल्या भागाचा शेवट ‘कटप्पाने बाहुबलीला का मारले’ या प्रश्नाने होत असल्याने दुसºया भागातून याचे उत्तर मिळणार अशी अपेक्षा सर्वांनाच होती. नव्या व्हिडीओमधून याचा खुलासा होईल अशी अपेक्षा अनेकांची असली तरी ती सध्या तरी फोल ठरली आहे. मात्र व्हिडीओ लीक प्रक रणानंतर बाहुबलीला फटका बसेल का याचा परीक्षण सुरू असल्याचे सांगण्यात येते आहे.
बाहुबलीचा दुसरा भाग पुढील वर्षी १७ एप्रिलला रिलीज होणार आहे.