​उर्वशी रौतेलाच्या ‘हेट स्टोरी4’ला ‘ए’ सर्टिफिकेट! दिग्दर्शक म्हणतो, आता चिंता नाही!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2018 15:41 IST2018-03-06T10:11:44+5:302018-03-06T15:41:44+5:30

उर्वशी रौतेलाच्या ‘हेट स्टोरी4’ला सेन्सॉर बोर्डाने ‘ए’ सर्टिफिकेट दिले आहे. या  चित्रपटात उर्वशीने कधी नव्हे इतके बोल्ड सीन्स दिले ...

Urvashi Route 'A' certificate to Hate Story4! The director says, do not worry now !! | ​उर्वशी रौतेलाच्या ‘हेट स्टोरी4’ला ‘ए’ सर्टिफिकेट! दिग्दर्शक म्हणतो, आता चिंता नाही!!

​उर्वशी रौतेलाच्या ‘हेट स्टोरी4’ला ‘ए’ सर्टिफिकेट! दिग्दर्शक म्हणतो, आता चिंता नाही!!

्वशी रौतेलाच्या ‘हेट स्टोरी4’ला सेन्सॉर बोर्डाने ‘ए’ सर्टिफिकेट दिले आहे. या  चित्रपटात उर्वशीने कधी नव्हे इतके बोल्ड सीन्स दिले आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. या ट्रेलरनंतर उर्वशीला जिवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचेही समोर आले आहे. ट्रेलरमधील संवादांवर काही लोकांनी आक्षेप घेतला आहे.   उर्वशीच्या तोंडचे हे संवाद द्रौपदीचा अपमान करणारे असल्याचा दावा या लोकांनी केला आहे.
चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये उर्वशीने स्वत:ची तुलना द्रौपदीसोबत केली आहे. ‘द्रौपदीचे तर पाच पती होते, येथे तर केवळ दोनच आहेत’, असे ती यात म्हणताना दिसतेस. उर्वशीच्या याच वाक्यामुळे काही लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. या चित्रपटात उर्वशी दोन भावांबरोबर रोमान्स करताना बघावयास मिळणार आहे. तूर्तास या वादामुळे उर्वशी चर्चेत आहेच. पण यातील बोल्ड सीन्समुळेही ती चर्चेत आली आहे. चित्रपटातील बोल्ड कंटेंट बघता, सेन्सॉर बोर्डानेही या चित्रपटाला ‘ए’ सर्टिफिकेट दिले आहे. ‘हेट स्टोरी’ फ्रेंचाइजी तशीही आपल्या बोल्ड कंटेंटसाठी ओळखली जाते. त्यामुळे ‘हेट स्टोरी4’ला ‘ए’ सर्टिफिकेट मिळण्यात काहीही आश्चर्यकारक नाही.  ‘हेट स्टोरी4’चे दिग्दर्शक विशाल पांड्या यांना विचाराल तर तेही ‘ए’ सर्टिफिकेट मिळाल्याने आनंदी आहेत. ‘हेट स्टोरी’ फ्रेंचाइजीच्या चौथ्या चित्रपटालाही ‘ए’ सर्टिफिकेट मिळाले आहे. ही माझ्यासाठी आनंदाची बातमी आहे. सेन्सॉर बोर्डाने याला यु/ए  सर्टिफिकेट दिले असते तर माझी चिंता वाढली असती. पण ‘ए’ सर्टिफिकेटमुळे मी निश्चिंत झालो आहे. कारण या फ्रेंचाइजीचा आपला एक खास चाहता वर्ग आहे. रोमांच, वासना आणि सूडाची भावना  या फ्रेंचाइजीचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे हा चित्रपट बघणारा एक खास वर्ग आहे, असे ते म्हणाले.

ALSO READ : ​​ट्रेलरपेक्षाही बोल्ड आहे ‘हेट स्टोरी4’चे पहिले गाणे !

Web Title: Urvashi Route 'A' certificate to Hate Story4! The director says, do not worry now !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.