​उर्वशी का मारतेय ‘गॅलॅक्सी’च्या खेटा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2016 17:18 IST2016-11-08T17:18:48+5:302016-11-08T17:18:48+5:30

उर्वशी रौतेला ब-याच दिवसांपासून बॉलिवूडमधून गायब आहे. ‘ग्रेट ग्रँड मस्ती’मध्ये उर्वशी दिसली. पण हा चित्रपट दणकून आपटला म्हटल्यावर उर्वशीचेही ...

Urvashi kills' Gallaxi khataa? | ​उर्वशी का मारतेय ‘गॅलॅक्सी’च्या खेटा?

​उर्वशी का मारतेय ‘गॅलॅक्सी’च्या खेटा?

्वशी रौतेला ब-याच दिवसांपासून बॉलिवूडमधून गायब आहे. ‘ग्रेट ग्रँड मस्ती’मध्ये उर्वशी दिसली. पण हा चित्रपट दणकून आपटला म्हटल्यावर उर्वशीचेही भाव पडले. तूर्तास तरी उर्वशीने कुठला चित्रपट साईन केल्याचे ऐकिवात नाही. पण अलीकडे उर्वशीच्या सलमानच्या घरी चकरा मात्र वाढलेल्या आहेत. याआधीही अनेक प्रसंगी उर्वशी सलमानच्या गॅलॅक्सी अपार्टमेंटमध्ये दिसलीयं. पण अलीकडे उर्वशीच्या गॅलॅक्सी अपार्टमेंटमध्ये चकरा वाढल्या आहेत. पण याब उर्वशी एक चकार शब्दही बोलायला तयार नाही. तिच्या प्रवक्त्यानेही यावर बोलायचे टाळले. त्यामुळे गलॅक्सी अपार्टमेंटमध्ये नेमकं शिजतयं तरी काय, हे कळायला मार्ग नाही.
सलमान लवकरच ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटात दिसणार आहे. सलमानची बहीण अलविरा अग्निहोत्री या चित्रपटाची निर्माती आहे. आता उर्वशी या चित्रपटात एखादे आयटम सॉंग करतये की एखादा कॅमिओ रोल, हे माहित नाही. पण सलमानसोबत वाढलेल्या मीटिंग्स बघता, उर्वशीची ‘लॉटरी’ लागणार, इतके मात्र स्पष्ट जाणवतेय. कारण सलमान कायम नव्या टॅलेंटला प्रोत्साहन देत आलाय. नव्या प्रतिभेला संधी देत आलाय. अनेक अभिनेत्रींचे करिअर त्याने सावरलेय. उर्वशीलाही अशाच एका संधीची प्रतीक्षा आहे. उर्वशीला अद्यापही म्हणावा तसा मोठा ब्रेक मिळाला नाही. कदाचित त्याचमुळे तिला सलमानची मदत घ्यावीशी वाटतेय. आता फक्त सलमानच्या मदतीचा हात उर्वशीला किती उंचीवर नेऊन पोहोचवतो, ते पाहणे खºया अर्थाने इंटरेस्टिंग ठरणार आहे. 

 

 

Web Title: Urvashi kills' Gallaxi khataa?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.