जीवनाला भरपूर जगण्याचा संदेश देणारे ‘उडजा रे’
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2016 10:03 IST2016-11-05T21:55:11+5:302016-11-06T10:03:35+5:30
जीवनाला भरपूर जगा व उंच भरारी घ्या असा सल्ला तिने आपल्या या गाण्यातून दिला आहे.

जीवनाला भरपूर जगण्याचा संदेश देणारे ‘उडजा रे’
फरहान अख्तर, श्रद्धा कपूर, अर्जुन रामपाल, पूरब कोहली, शशांक अरोडा, प्राची देसाई यांच्या भूमिका असनारा ‘रॉक आॅन 2’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. या चित्रपटातील गाणी ही युवकांच्या ओठांवर रुळली आहे. ‘रॉक आॅन 2’चे प्रमोशन करण्यासाठी संपूर्ण स्टारकास्ट कामी लागली असल्याचे दिसते. यासाठी विविध ठिकाणी कन्स्टर्स आयोजित करण्यात येत आहे.
‘रॉक आॅन 2’मधील उडजा रे हे गाण्यामध्ये श्रद्धा कपूरवर फोकस करण्यात आले आहे. हे गाणे श्रद्धाने एका कॅन्सर्टमध्ये गात असल्याचे दिसते. रॉक आॅन 2ची गाणी जावेद अख्तर यांनी लिहिली असून यात त्यानू भरपूर जगण्याचा सल्ला दिलाया. तोच श्रद्धाने आपल्या आवाजातून चाहत्यांपर्यंत पोहचविला आहे. या चित्रपटाला शंकर, एहसान, लॉय यांनी संगीत दिले आहे. या गाण्याला श्रद्धाने न्याय दिला असून ती चांगली गायिका असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
‘रॉक आॅन 2’ मध्ये श्रद्धाची प्रमुख भूमिका असल्याचे सांगण्यात येत आहे. याचमुळे प्राची देसाई नाराज असल्याचेही सांगण्यात येते. मात्र ‘रॉक आॅन 2’च्या ट्रेलर लाँचच्यावेळी प्राची देसाई पोहचल्याने या चर्चांना विराम मिळाला आहे.
">http://