ट्विंकल खन्नाने म्हटले, अक्षय कुमारसारखा पती असतानाही सेक्शुअल हॅरेसमेंटला पडले बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2017 12:51 IST2017-03-22T15:39:35+5:302017-03-23T12:51:22+5:30

डॅशिंग अभिनेता अशी ओळख असलेला अक्षय कुमार याची पत्नी ट्विंकल खन्ना सेक्शुअल हॅरेसमेंटला बळी पडली आहे. नुकताच तिने एका ...

Twinkle Khanna said, even after having a husband like Akshay Kumar, sexual exploitation fell victim to the victim | ट्विंकल खन्नाने म्हटले, अक्षय कुमारसारखा पती असतानाही सेक्शुअल हॅरेसमेंटला पडले बळी

ट्विंकल खन्नाने म्हटले, अक्षय कुमारसारखा पती असतानाही सेक्शुअल हॅरेसमेंटला पडले बळी

शिंग अभिनेता अशी ओळख असलेला अक्षय कुमार याची पत्नी ट्विंकल खन्ना सेक्शुअल हॅरेसमेंटला बळी पडली आहे. नुकताच तिने एका प्रसिद्ध वृत्तपत्राच्या कॉलममध्ये याबाबतचा उल्लेख केला. ट्विंकलने केलेल्या खुलाशानुसार, काही वर्षांपूर्वी माझ्या मोबाइलवर एक मेसेज आला होता. ज्यामुळे मी प्रचंड घाबरली होती. वास्तविक एका गर्भश्रीमंत क्लाइंटचा तो अश्लील मेसेज होता. मी माझे काम प्रोफेशनल पद्धतीने पूर्ण करू इच्छित होती अन् मी तशाच पद्धतीने ते पूर्णही केले असे तिने सांगितले. 



‘मिसेज फनीबोन्स’ आणि ‘द लीजेंड आॅफ लक्ष्मीप्रसाद’ यासारख्या प्रसिद्ध पुस्तकांचे लिखाण केलेल्या ट्विंकलने पुढे लिहिले की, मी एक तापट स्वभावाची महिला आहे. माझा विवाह अशा व्यक्तीशी झाला आहे, जो सिनेमात एका बुक्क्यात भिंत तोंडतो. असे असतानाही या लोकांनी मला सोडले नाही. अशात त्या महिलांचे काय हाल होत असतील, जे कामानिमित्त घर सोडून बाहेर जात असतात. नॅशनल बार असोसिएशनच्या अहवालानुसार देशात ३८ टक्के महिलांना कामाच्या ठिकाणी सेक्शुअल हॅरेसमेंटला बळी पडावे लागते. 



यावेळी ट्विंकलने कामाच्या ठिकाणी महिलांसोबत केल्या जात असलेल्या दूरव्यवहाराविषयीही लिहिले. मुलींचा पाठलाग नका करू, त्यांची छळ काढू नका , त्यांना अश्लील संदेश आणि ई-मेल पाठवू नका. त्यांना हॉट-सेक्सी म्हणण्याऐवजी त्यांच्यातील स्किल्सचे कौतुक करा. ट्विंकलच्या या लेखाचे कौतुक खुद्द अक्षय कुमार यानेही केले. वास्तविक ट्विंकल नेहमीच तिच्या परखड विचारांमुळे चर्चेत असते. आता पुन्हा तिने हा अतिशय सहिष्णू अशा मुद्द्यावर लेखन करून व्यवस्थेप्रती नाराजी व्यक्त केली आहे. 

Web Title: Twinkle Khanna said, even after having a husband like Akshay Kumar, sexual exploitation fell victim to the victim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.