तुषार कपूरनं लग्न का केलं नाही? म्हणाला,मी कधीच लग्न करणार नाही...!  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 04:15 PM2021-06-02T16:15:03+5:302021-06-02T16:18:35+5:30

तुषार कपूर हा दिग्गज अभिनेते जितेंद्र आणि निर्मात्या शोभा कपूर यांचा धाकटा मुलगा.

tusshar kapoor said he will never get married follow ekta kapoor line | तुषार कपूरनं लग्न का केलं नाही? म्हणाला,मी कधीच लग्न करणार नाही...!  

तुषार कपूरनं लग्न का केलं नाही? म्हणाला,मी कधीच लग्न करणार नाही...!  

googlenewsNext
ठळक मुद्देतुषारने बॉलिवूडमध्ये पदार्पण करुन नुकतीच वीस वर्ष झाली. 2001 मध्ये मुझे कुछ कहना है चित्रपटातून त्याने डेब्यू केला होता.

बॉलिवूडमध्ये काही अभिनेते अजूनही अविवाहित आहेत. अभिनेता तुषार कपूर (Tusshar Kapoor) यापैकीच एक.  44 वर्षाच्या तुषारने अद्याप लग्न केलेले नाही. पण तो एका मुलाचा बाप आहे. सरोगसीच्या माध्यमातून त्याने मुलाला जन्म दिला. आता तुषारचा मुलगा 5 वर्षांचा होईल. अर्थात अद्यापही लग्न कधी करणार?असा प्रश्न तुषारला केला जातो. पण तुषारचे म्हणाल तर तो ठाम आहे. होय, लग्न न करण्याच्या निर्णयावर तो ठाम आहे.
ई टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत तुषार कपूरने त्याच्या पर्सनल लाईफबद्दल एक मोठे वक्तव्य केले.
 मी सिंगल आहे आणि यातच आनंदी आहे. आत्ताच नाही तर भविष्यातही लग्न करण्याचा माझा कुठलाही इरादा नाही. लग्न न करण्याच्या निर्णयावर मी ठाम आहे. खरं सांगायचे तर मी स्वत:ला अन्य कुणासोबत शेअर करू इच्छित नाही. मी बाप आहे. माझा मुलगा लक्ष्य रोज मला काहीतरी नवीन शिकवत असतो. याशिवाय कुठला पर्याय मला निवडायचा नाही. मी स्वत:ला इतरांसोबत शेअर करु शकत नाही, असे तुषार म्हणाला.

 तुषार कपूर जून 2016 मध्ये सरोगसीच्या माध्यमातून पिता झाला. तो एकटा मुलाला सांभाळत आहे. सिंगल फादर बनण्याचा अनुभवही त्याने शेअर केला. मुलासोबत माझा दिवस कसा जातो, मलाही कळत नाही. माझा मुलगा हाच माझे जग आहे. सिंगल पॅरेंट बनण्याच्या निर्णयाबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नव्हती. यापेक्षा दुसरा चांगला निर्णय असूच शकला नसता. मी योग्य वयात, योग्य निर्णय घेतला, असे तो म्हणाला.

तुषार कपूर हा दिग्गज अभिनेते जितेंद्र (Jeetendra) आणि निर्मात्या शोभा कपूर यांचा धाकटा मुलगा. त्याची मोठी बहीण एकता कपूर (Ekta Kapoor) प्रख्यात चित्रपट निर्माती आहे. एकताही अविवाहित आहे. भावाच्या पावलावर पाऊल ठेवत एकतानेही 2019 मध्ये सरोगसीच्या माध्यमातून मुलीला जन्म दिला.
तुषारने बॉलिवूडमध्ये पदार्पण करुन नुकतीच वीस वर्ष झाली. 2001 मध्ये मुझे कुछ कहना है चित्रपटातून त्याने डेब्यू केला होता. कुछ तो है, गायब, खाकी असा काही सिनेमात झळकल्यानंतर क्या कूल है हम या चित्रपटामुळे त्याला विनोदी अभिनेता म्हणून ओळख मिळाली. त्यानंतर गोलमाल सिरीजमुळे तो आणखी लोकप्रिय झाला.

Web Title: tusshar kapoor said he will never get married follow ekta kapoor line

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.