‘चित्रपटात फ्लॉप ठरली म्हणून ट्विटरवर स्टार होण्याचा प्रयत्न’; दिया मिर्झावर नेटिझन्सचा हल्लाबोल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2017 17:24 IST2017-07-13T11:52:29+5:302017-07-13T17:24:09+5:30

गेल्या सोमवारी (१० जुलै) दहशतवाद्यांनी अमरनाथला जाणाºया भाविकांच्या बसवर बेछूट गोळीबार करीत भ्याड हल्ला केला. यामध्ये सात भाविकांचा मृत्यू ...

'Trying to become a star on Twitter as a flop in the film'; Netizens attacked the miraculous! | ‘चित्रपटात फ्लॉप ठरली म्हणून ट्विटरवर स्टार होण्याचा प्रयत्न’; दिया मिर्झावर नेटिझन्सचा हल्लाबोल!

‘चित्रपटात फ्लॉप ठरली म्हणून ट्विटरवर स्टार होण्याचा प्रयत्न’; दिया मिर्झावर नेटिझन्सचा हल्लाबोल!

ल्या सोमवारी (१० जुलै) दहशतवाद्यांनी अमरनाथला जाणाºया भाविकांच्या बसवर बेछूट गोळीबार करीत भ्याड हल्ला केला. यामध्ये सात भाविकांचा मृत्यू तर ३२ भाविक गंभीर जखमी झाले. दहशतवाद्यांच्या या हल्ल्याचा देशभरात तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. काहींनी तर दहशतवाद्यांचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. बॉलिवूड कलाकारांनीदेखील या भ्याड हल्ल्याचा निषेध केला. परंतु अभिनेत्री दिया मिर्झा हिने वेगळाच सूर आळवल्याने, नेटिझन्समध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. नेटिझन्सनी दियावर हल्लाबोल करीत, चित्रपटांमध्ये फ्लॉप ठरत असल्याने ट्विटरवर स्टार होण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत असल्याचे म्हटले आहे. }}}} ">"Amarnath was discovered by a Muslim shepherd, Buta Malik, in 1850." Has been a symbol of shared community, respect, and love. #MyIndia— Dia Mirza (@deespeak) July 11, 2017वास्तविक दिया मिर्झाने अमरनाथ गुहेचा शोध यावरून एक ट्विट केले होते. ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘१८५० मध्ये अमरनाथ गुहेचा शोध बूटा मलिक नावाच्या एका मुस्लीम व्यक्तीने लावला. हे स्थळ दोन्ही समुदायांमध्ये शांती आणि एकता निर्माण करण्याचे प्रतीक आहे.’ दियाच्या या ट्विटनंतर युजर्सनी तिच्यावर हल्लाबोल केला. एक युजर्सने ट्विटरच्या माध्यमातून दियाला विचारले की, ‘तू डॅमेज कंट्रोल करीत आहेस, परंतु हिंदूंवर झालेल्या या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करीत नाहीस.’ आणखी एका युजर्सने दियावर हल्ला करताना ट्विट केले की, ‘तू काश्मीरमधून हाकलून देण्यात आलेल्या काश्मिरी पंडितांविषयी एक शब्दही लिहत नाहीस. त्यांची मंदिरे कोणी उद्ध्वस्त केली?’  }}}} ">Filmi dhandha nahi chala toh twitter par star banenge

Filmi dhandha nahi chala toh twitter par star banenge— Jitendra Soni (@SoniJiSaid) July 11, 2017}}}} ">— Jitendra Soni (@SoniJiSaid) July 11, 2017तर एका ट्विटरने लिहिले की, ‘तुझे चित्रपट चालत नसल्याने तू ट्विटरवर स्टार होण्याचा प्रयत्न करीत आहेस.’ युजर्सच्या या चौफेर हल्ल्यानंतर दिया मिर्झा काय उत्तर देईल याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, दियाच्या या वादग्रस्त ट्विटमुळे सोशल मीडियावर ती टीकेचे लक्ष्य ठरत आहे. दिया बºयाच कालावधीपासून चित्रपटांमधून गायब आहे. मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून ती नेहमीच चर्चेत असते. 

Web Title: 'Trying to become a star on Twitter as a flop in the film'; Netizens attacked the miraculous!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.