Trolling : अबब... प्रियंका चोपडाच्या घेरदार घागऱ्याने झाकले चक्क क्रिकेटचे मैदान!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2017 14:01 IST2017-05-03T08:21:48+5:302017-05-03T14:01:00+5:30

सेलिब्रिटीने एखादा कारनामा केला की, लगेचच त्याचे पडसाद सोशल मीडियावर उमटतात. त्यातही ट्विटरवर ‘ट्रोल’चा ट्रेण्ड असल्याने हा कारनामा काही ...

Trolling: Above ... Priyanka Chopra's cribbuster covered the cricket ground !! | Trolling : अबब... प्रियंका चोपडाच्या घेरदार घागऱ्याने झाकले चक्क क्रिकेटचे मैदान!!

Trolling : अबब... प्रियंका चोपडाच्या घेरदार घागऱ्याने झाकले चक्क क्रिकेटचे मैदान!!

लिब्रिटीने एखादा कारनामा केला की, लगेचच त्याचे पडसाद सोशल मीडियावर उमटतात. त्यातही ट्विटरवर ‘ट्रोल’चा ट्रेण्ड असल्याने हा कारनामा काही क्षणातच सुपरडूपर हिट होतो. अर्थातच नकारात्मक अन् सकारात्मक या दोन्ही अर्थाने. असाच काहीसा अभिनेत्री प्रियंका चोपडाचा कारनामा सध्या ट्विटरवर ट्रोल केला जात आहे. आता यास ‘कारनामा’ म्हणावे काय? परंतु जगातील सर्वात मोठ्या फॅशन फेस्टिव्हल मेट गाला २०१७ मध्ये प्रियंकाने परिधान केलेला भव्य ड्रेसवरून ज्या पद्धतीने पीसीला ट्रोल केले जात आहे, त्यावरून हा तिने कारनामाच केला असावा, असे म्हणायला हरकत नाही.





प्रियंकाने या फॅशन फेस्टिव्हलमध्ये राल्फ लॉरेन यांनी डिझाइन केलेला खाकी रंगातील ट्रेंच कोट परिधान केला होता. तिने रेड कार्पेटवर एंट्री करताच सगळे अवाक् झाले. कारण तिने परिधान केलेला ट्रेंच कोट हा जगातील सर्वाधिक लांब ट्रेंच कोट असल्याचे आता बोलले जात आहे. त्यामुळे एवढा मोठा कोट परिधान करणाºया प्रियंकाच्या नावे एक रेकॉर्डची नोंदही झाली आहे. मग प्रियंकाचा हा रेकॉर्ड सोशल मीडियावर चर्चिला जाऊ नये तरच नवल. परंतु ज्या पद्धतीने तो चर्चिला जात आहे; त्यावरून प्रियंकाने कोट परिधान करताना अशा पद्धतीने तो ट्रोल केला जाईल, असा विचारही केला नसेल हे मात्र नक्की.  






कारण हा कोट किती महत्त्वपूर्ण आहे, हे दाखविण्यासाठी नेटिझन्स सध्या धडपड करीत आहेत. कोणाला हा ड्रेस लांब झाडूसारखा दिसत असल्याने स्वच्छ भारत अभियानासाठी पीसीला ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर म्हणून घोषित करायला हवे, तर कोणी या ड्रेसला कुस्तीचा आघाडा म्हणून संबोधत आहे. ज्यावर आमिर खान याच्या ‘दंगल’ अन् सलमानच्या ‘सुलतान’मधील सामने रंगत आहेत. एका नेटिझन्सने तर या ड्रेसवर कॉमेण्ट देताना असे लिहिले की, प्रियंका कपडे खरेदी करण्यासाठी बाजारात गेली होती; परंतु विक्रेत्याकडे दोन हजार रुपयांचे सुट्टे नसल्याने तिने कपड्याचे संपूर्ण रिलच घरेदी केले. अन् हेच रिल परिधान करून तिने फेस्टीव्हलमध्ये हजेरी लावली. 







सगळ्यात मजेशीर बाब म्हणजे पीसीच्या या ड्रेसवर पंतप्रधान नरेंद्र मोदी अन् दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल चक्क योगा करीत असल्याचा एक फोटो पोस्ट केला आहे. तर एकाने त्यास अल्लाउद्दीनची चटई म्हणून चक्क आकाशात उडताना दाखविले आहे. सर्वात मजेशीर बाब म्हणून पीसीच्या या ड्रेसनी एक व्यक्ती चक्क क्रिकेटचे ग्राउंड झाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. असे बरेचसे फोटोज् सध्या शेअर केले जात असून, तुम्ही खाली हे फोटो बघू शकता. 











Web Title: Trolling: Above ... Priyanka Chopra's cribbuster covered the cricket ground !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.