Trending : कॅटरिना कैफचा लेटेस्ट फोटो तुम्ही बघितला काय? फोटोने इंटरनेटवर उडविली धूम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2017 21:13 IST2017-03-08T15:43:44+5:302017-03-08T21:13:44+5:30

बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री कॅटरिना कैफ सध्या कुठे आहे, असा जर कोणी प्रश्न विचारला तर त्यात काहीही गैर नसेल. कारण ...

Trending: Did you see Catarina Kaif's latest photo? Photo blown on the internet! | Trending : कॅटरिना कैफचा लेटेस्ट फोटो तुम्ही बघितला काय? फोटोने इंटरनेटवर उडविली धूम!

Trending : कॅटरिना कैफचा लेटेस्ट फोटो तुम्ही बघितला काय? फोटोने इंटरनेटवर उडविली धूम!

लिवूडमधील आघाडीची अभिनेत्री कॅटरिना कैफ सध्या कुठे आहे, असा जर कोणी प्रश्न विचारला तर त्यात काहीही गैर नसेल. कारण गेल्या काही महिन्यांपासून कॅटरिना बॉलिवूडमधून जणूकाही गायबच झाली आहे. परंतु आता कॅटरिनाचा शोध लागला असून, तिने फेसबुकवर शेअर केलेला एक बीचसाइड फोटो इंटरनेटवर अक्षरश: धूम उडवून देत आहे. 

२०१६ मध्ये आलेल्या ‘बार बार देखो’ या सिनेमात कॅटरिना बघावयास मिळाली होती. आता पुन्हा ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चेत आली आहे. तिने हा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘संपूर्ण आयुष्य मी या लाटांच्या विरुद्ध जगत आली आहे. मी काय करू शकते? कदाचित मी अशीच आहे.’ गेल्या मंगळवारी शेअर केलेल्या या फोटोला आतापर्यंत १ लाख २७ हजार लाइक्स मिळाले असून, ५७० पेक्षा अधिक युजर्सने तिचा हा फोटो शेअर केला आहे. तर दोन हजारांपेक्षा अधिक कमेंट्स या फोटोला मिळाल्या आहेत. 
">http://

गेल्यावर्षी कॅटरिना ‘बार बार देखो’ व्यतिरिक्त आदित्य रॉय कपूरबरोबर ‘फितूर’मध्ये बघावयास मिळाली होती. तिचे हे दोन्ही सिनेमे बॉक्स आॅफिसवर सपशेल अयशस्वी ठरले होते. त्यातच तिचा एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूर याच्यासोबतही ब्रेकअप झाल्याने ती खूपच अपसेट होती. आता ती अनुराग बासू यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘जग्गा जासूस’मध्ये बघावयास मिळणार असून, हा सिनेमा ७ एप्रिल रोजी रिलीज होणार होता. मात्र या सिनेमाची राम गोपाल वर्मा यांच्या ‘सरकार-३’बरोबर टक्कर होणार असल्याने, सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आल्याचे समजते.  

दरम्यान, सध्या कॅटरिना सलमान खानबरोबर ‘एक था टायगर’चा सीक्वल ‘टायगर जिंदा हंै’मध्ये काम करीत आहे. अली अब्बास जफर यांच्या दिग्दर्शनात बनत असलेल्या या सिनेमात सलमान रॉ एजंटच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर कॅटरिनाही त्याच्यासोबत महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. 

Web Title: Trending: Did you see Catarina Kaif's latest photo? Photo blown on the internet!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.