​‘टॉयलेट: एक प्रेमकथा’ लांबणीवर; बॉक्सआॅफिसवर रंगणार अक्षय Vs शाहरूख सामना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2017 11:18 IST2017-03-28T05:48:52+5:302017-03-28T11:18:52+5:30

अक्षय कुमारचा ‘टॉयलेट: एक प्रेमकथा’ हा आगळ्या-वेगळ्या विषयाला वाहिलेल्या सिनेमाची प्रतीक्षा लांबलीय. होय, हा चित्रपट आधी २ जूनला रिलीज ...

'Toilet: A Love Story' Prolonged; Boxer Akshay Vs will face Shahrukh | ​‘टॉयलेट: एक प्रेमकथा’ लांबणीवर; बॉक्सआॅफिसवर रंगणार अक्षय Vs शाहरूख सामना!

​‘टॉयलेट: एक प्रेमकथा’ लांबणीवर; बॉक्सआॅफिसवर रंगणार अक्षय Vs शाहरूख सामना!

्षय कुमारचा ‘टॉयलेट: एक प्रेमकथा’ हा आगळ्या-वेगळ्या विषयाला वाहिलेल्या सिनेमाची प्रतीक्षा लांबलीय. होय, हा चित्रपट आधी २ जूनला रिलीज होणार होता. पण ताज्या रिपोर्ट्सनुसार चित्रपटाची रिलीज डेट लांबणीवर टाकण्यात आली आहे. आता अक्षय कुमार व भूमी पेडणेकर स्टारर हा सिनेमा येत्या ११ आॅगस्टला रिलीज होणार असल्याचे कळतेय. असे झालेच तर बॉक्सआॅफिसवरचा संघर्ष अटळ असणार आहे. कारण ११ आॅगस्ट याच दिवशी बॉक्सआॅफिसवर आणखी एक सिनेमा झळकणार आहे. हा सिनेमा आहे शाहरूख खानचा. म्हणजे अक्षय व शाहरूख यांची टक्कर यानिमित्ताने बघायला मिळण्याची शक्यता आहे.
शाहरूख खान स्टारर आणि इम्तियाज अली दिग्दर्शित चित्रपट याच तारखेला रिलीज होणार आहे. इम्तियाजच्या या चित्रपटात शाहरूख व अनुष्का शर्माची जोडी दिसणार आहे. आधी या चित्रपटाचे नाव ‘दी रिंग’ असल्याचे सांगण्यात आले होते. आता हे नाव बदलून ‘रहनुमा’ असे ठेवण्यात आल्याचे कळते. त्यामुळे ‘टॉयलेट: एक प्रेमकथा’ आणि ‘रहनुमा’चा  बॉक्सआॅफिस सामना टळतो की रंगतो आणि रंगलाच तर कसा रंगतो, हे पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे.

ALSO READ : शाहरूख खानने इम्तियाज अलीबद्दल ‘असे’ का म्हटले असावे?

‘टॉयलेट: एक प्रेमकथा’हा चित्रपट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाला समर्थन करणार आहे. या चित्रपटातून स्वच्छता न राखणा-यांवर विनोदाच्या माध्यमातून टीका करण्यात आली आहे. केशव हा  पे अ‍ॅण्ड युज टॉयलेट  चालवत असतो. या टॉयलेटमध्ये येणाºया जया नामक मुलीच्या केशव प्रेमात पडतो आणि पुढे दोघांचे लग्न होते. या चित्रपटाच्या माध्यमातून एक स्वच्छतेचा संदेश देण्यात आला आहे. अनुपम खेर यांची यात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. होशंगाबाद, भोपाळ आणि नर्मदा खोºयात या चित्रपटाचे शूटींग झाले. 

Web Title: 'Toilet: A Love Story' Prolonged; Boxer Akshay Vs will face Shahrukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.