​‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ हिट! ट्विंकल खन्नाचा शाहरूख-सलमानला असाही टोमणा!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2017 16:21 IST2017-08-14T10:50:57+5:302017-08-14T16:21:39+5:30

चालू वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात एका पाठोपाठ एक असे अनेक चित्रपट बॉक्सआॅफिसवर झळकले आणि तसेच एकापाठोपाठ एक असे फ्लॉपही ...

'Toilet: A Love Story' hit! Twinkle Khanna's Seven Shahrukh-Salman | ​‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ हिट! ट्विंकल खन्नाचा शाहरूख-सलमानला असाही टोमणा!!

​‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ हिट! ट्विंकल खन्नाचा शाहरूख-सलमानला असाही टोमणा!!

लू वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात एका पाठोपाठ एक असे अनेक चित्रपट बॉक्सआॅफिसवर झळकले आणि तसेच एकापाठोपाठ एक असे फ्लॉपही झालेत. काही एक-दोन सिनेमे सोडले तर सगळ्याच चित्रपटांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. निश्चितपणे बॉलिवूडसाठी हा चिंतेचा विषय ठरला. अर्थात गत शुक्रवारी रिलीज झालेल्या ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ या चित्रपटाने सगळ्यांची चिंता दूर केली. होय, या चित्रपटाने आपल्या पहिल्या वीकेंडला ५१ कोटी रूपयांची कमाई करत, बॉलिवूडच्या जीवात जीव आणला. या चित्रपटानंतर अक्षयला बॉलिवूडचा ‘खिलाडी’ का म्हटले जाते, हेही सगळ्यांना कळून चुकले. होय, अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना हिनेही तिचा पती हाच बॉलिवूडचा खरा ‘खिलाडी’ असल्याचे मान्य केले. अर्थात केवळ मान्यच केले नाही तर ते मान्य करताना सलमान खान व शाहरूख खानसारख्या सुपरस्टार्सला अप्रत्यक्ष टोलाही लगावला.
 





















‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ने पहिल्या वीकेंडमध्ये ५१ कोटींची कमाई केली, ही गुडन्यूज ट्विंकल  twitterवर शेअर केली.  ‘तो बॉक्स आॅफिस को भी अपना कॉन्स्टिपेशन दूर करने के लिए टॉयलेट की जरुरत है. टॉयलेट एक प्रेम कथा हिट.. हिट हुर्रे,’ असे tweet तिने केले. ट्विंकलच्या या tweetमधून नव-याबद्दलचा अभिमान दिसत असला तरी, तिचे हे tweet सलमान व शाहरूखला कुठल्या चपराकीपेक्षा कमी नाही. कारण सलमानचा ‘ट्यूबलाईट’ आपटला आणि शाहरूखचा अलीकडे रिलीज झालेल्या ‘जब हॅरी मेट सेजल’हा चित्रपटही फ्लॉप झाला. आता शाहरूख- सलमानचे चित्रपट फ्लॉप होत असतील तर बाकींचा काय टिकाव लागेल, असेच सगळ्यांना वाटले होते. पण अक्षयने बाजी मारली.  चित्रपट चांगल्या कथेमुळे चालतात, स्टार पॉवरमुळे नाही, हेच अक्षयने दाखवून दिले. कदाचित ट्विंकललाही आपल्या tweetमधून हेच सांगायचे असेल.

Web Title: 'Toilet: A Love Story' hit! Twinkle Khanna's Seven Shahrukh-Salman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.