टिस्काला चाहत्याने घातली लग्नाची मागणी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2016 16:29 IST2016-10-15T16:29:10+5:302016-10-15T16:29:10+5:30
टिस्का चोप्रा ही एक गुणी अभिनेत्री. आपल्या अभिनयाच्या जोरावर फार कमी वेळात तिने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. ...
.jpg)
टिस्काला चाहत्याने घातली लग्नाची मागणी!
ट स्का चोप्रा ही एक गुणी अभिनेत्री. आपल्या अभिनयाच्या जोरावर फार कमी वेळात तिने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. चाहत्यांकडून टिस्काला भरभरून प्रेम मिळाले, मिळतेयं. इतके की टिस्काला आॅनलाईन लग्नाचे प्रस्ताव येत आहेत. होय, अलीकडे टिस्काच्या प्रेमात वेड्या झालेल्या एका चाहत्याने टिस्काला टिष्ट्वटरवर लग्नाची मागणी घातली. माझ्याशी लग्न करशील का? अशा शब्दांत त्याने टिस्कासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. मग? मग काय?? टिस्कानेही या चाहत्याना निराश न करता अगदी सुंदर उत्तर दिले. तिने उत्तर दिले,‘मला याचीच प्रतीक्षा होती. धन्यवाद...होय, मी तयार आहे. तुझी सगळी माहिती मला पाठव. कारण माझ्या नवºयालाही हे जाणून घेण्याची उत्सुकता असेल की, मी त्याला कुणासाठी सोडतेय...’ आता टिस्काच्या या उत्तराने तिचा चाहता गारद झाला नसेल तर नवल!!
{{{{twitter_post_id####
{{{{twitter_post_id####
}}}}Was just waiting to be asked, thank you. Yes I will. Please send me all details. My husband also wants to see who I am leaving him for.. https://t.co/AqtvngLAo7— Tisca Chopra (@tiscatime) October 13, 2016