​छोटा नबाव तैमूर अली खानचे दर्शन होणार दुर्मिळ! सैफ व करिनाने घेतला मोठा निर्णय!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2017 10:14 IST2017-10-06T04:44:51+5:302017-10-06T10:14:51+5:30

तैमूर अली खान कुठल्याही सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. अलीकडे तर आई करिना कपूर आणि पापा सैफ अली खान यांच्यापेक्षाही तैमूर ...

TIMUR ALI KHAN'S DIFFERENT TRIAL Saif and Karina took big decision !! | ​छोटा नबाव तैमूर अली खानचे दर्शन होणार दुर्मिळ! सैफ व करिनाने घेतला मोठा निर्णय!!

​छोटा नबाव तैमूर अली खानचे दर्शन होणार दुर्मिळ! सैफ व करिनाने घेतला मोठा निर्णय!!

मूर अली खान कुठल्याही सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. अलीकडे तर आई करिना कपूर आणि पापा सैफ अली खान यांच्यापेक्षाही तैमूर चर्चेत आहे. तो दिसला रे दिसला की कॅमेरे त्याच्याकडे वळतात. त्याची एक झलक टीपण्यासाठी पापाराझींची झुंबड उडते. इतके कमी की काय म्हणून अलीकडे तैमूरच्या बॉलिवूड कॅमिओच्या अफवाही उडताहेत. पण खरे सांगायचे तर, प्रत्येक पालकांप्रमाणे तैमूरचे मम्मी-पापा यामुळे चिंतीत आहे. इतक्या लहान वयात तैमूरला इतकी प्रसिद्धी मिळतेय, हे पाहून करिना व सैफची चिंता वाढली आहे. या सगळ्या झगमगाटात  स्टारकिड्स म्हणून मोठा होताना तैमूरचे बालपण हिरावले जायला नको, असे करिना व सैफला वाटू लागले आहे. याचमुळे दोघांनीही तैमूरबद्दल एक मोठा निर्णय घेतला आहे. होय, तैमूरला बोर्डिंग स्कूलमध्ये ठेवण्याचा.
अलीकडे एका मुलाखतीत सैफने तैमूरबद्दल चिंता व्यक्त केली. तैमूर एक चिमुकला जीव आहे. त्याच्या डोळ्यांत कमालीचा निष्पापपणा आहे. त्याच्याभोवतीच्या स्टारडमची कल्पना आम्हाला आहे. करिना व मी याबद्दल चर्चाही केलीय. पण या सगळ्यांमुळे त्याचे लहानपण, त्याचा निष्पापपणा प्रभावित होऊ नये, असे आम्हाला वाटत आहे. त्यामुळे आम्ही त्याला इंग्लडच्या एका चांगल्या बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.   आशा आहे, या निर्णयामुळे सगळे काही ठीक होईल, असे सैफ म्हणाला.



आता पतौडी घराण्यात विदेशात शिकणे नवी गोष्ट नाही. पतौडी कुटुंबातील प्रत्येकजण विदेशात शिकला आहे. सैफ सुद्धा वयाच्या नवव्या वर्षांपासून इंग्लडच्या एका प्रतिष्ठित बोर्डिंग स्कूलमध्ये शिकला. आता तैमूरबद्दलही हीच प्रथा फॉलो करणार, एवढेच. अर्थात यामुळे एक मात्र होणार, बोर्डिंगमध्ये गेल्यानंतर तैमूरचे दर्शन दुर्मिळ होणार आणि एकदिवस अगदी चित्रपटात दाखवतात त्याप्रमाणे तैमूर एकदम हँडसम तरूण बनून सर्वांसमोर येणार. अगदी आपल्या डॅडप्रमाणे हँडसम!
तैमूरची मम्मी करिना कपूर सध्या ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. पण या बिझी शेड्यूलमध्येही लाडका तैमूर तिच्यासोबत आहे. तैमूरला घेऊन करिना अलीकडे ‘वीरे दी वेडिंग’च्या शूटींगसाठी दिल्लीला पोहोचली होती. त्यामुळे या चित्रपटात छोटा नवाब तैमूर अली खान दिसणार, अशी एक अफवा पसरली होती. पण आता स्वत: करिनाने ही अफवा धुडकावून लावत तैमूर या चित्रपटात दिसणार नसल्याचे स्पष्ट केले होते. 

ALSO READ : OMG!! इतका ‘महाग’ आहे करिना कपूरचा मुलगा तैमूर की, प्रोड्यूसरला खर्च पेलवेना!

Web Title: TIMUR ALI KHAN'S DIFFERENT TRIAL Saif and Karina took big decision !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.