बोल्ड फोटो शेअर करून टायगर श्रॉफच्या ‘या’ अभिनेत्रीने उडविली खळबळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2018 22:07 IST2018-02-18T16:37:16+5:302018-02-18T22:07:58+5:30
टायगर श्रॉफच्या या अभिनेत्रीने सोशल मीडियावर काही फोटोज् शेअर केले असून, चाहत्यांकडून ते प्रचंड पसंत केले जात आहेत. तिच्या या फोटोंमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.
.jpg)
बोल्ड फोटो शेअर करून टायगर श्रॉफच्या ‘या’ अभिनेत्रीने उडविली खळबळ!
अ िनेता टायगर श्रॉफसोबत ‘मुन्ना मायकल’ या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री निधी अग्रवाल सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चिली जात आहे. होय, तिचे काही बोल्ड फोटोज् समोर आले असून, ब्लॅक आउटफिटमध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. हे फोटो निधीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. सध्या निधीच्या या फोटोमुळे सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली असून, तिचे हे फोटो वाºयासारखे व्हायरल होत आहेत.
![]()
बेंगळुरू येथे राहणारी निधी एक अभिनेत्री असण्याबरोबर प्रसिद्ध मॉडेलही आहे. शिवाय ‘मिस दीवा-२०१४’ या स्पर्धेची ती स्पर्धक राहिली आहे. तिने बिजनेस मॅनेजमेंटमध्ये ग्रॅज्युएशन केले असून, सध्या ती पूर्णपणे अभिनय क्षेत्रात लक्ष देऊन आहे. २०१७ मध्ये निधीने ‘मुन्ना मायकल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. वास्तविक तिचा हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर फारसा यशस्वी ठरला नाही. मात्र प्रेक्षकांना तिचा अभिनय खूपच भावला होता. समीक्षकांनीही तिच्या अभिनयाचे कौतुक केले होते.
![]()
![]()
सध्या निधीकडे कुठल्याही बॉलिवूडपटाची आॅफर नाही. ती साउथच्या Savyasachi या चित्रपटात सध्या काम करीत आहे. तिचा हा चित्रपट याच वर्षी प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, निधी सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहणे पसंत करते. तिच्या प्रत्येक फोटोला चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळतो. तिच्या सोशल अकाउंटवर फॉलोअर्स वाढत असून, तिने लवकरच आणखी एका बॉलिवूडपटात झळकावे अशी तिच्या चाहत्यांची इच्छा असेल यात शंका नाही.