‘बागी2’मधील टायगर श्रॉफच्या बदलेल्या लूकमागे आहे पाच आठवड्यांची कहाणी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2018 14:23 IST2018-02-22T08:53:37+5:302018-02-22T14:23:37+5:30

‘बागी2’चा दमदार ट्रेलर तुम्ही पाहिलाचं. या ट्रेलरमध्ये अभिनेता टायगर श्रॉफचा अवतारही तितकाच दमदार आहे. त्याचा लूकही एकदम हटके आहे. ...

Tiger Shroff's changed look at 'Baggi2' is a five-week story! | ‘बागी2’मधील टायगर श्रॉफच्या बदलेल्या लूकमागे आहे पाच आठवड्यांची कहाणी!

‘बागी2’मधील टायगर श्रॉफच्या बदलेल्या लूकमागे आहे पाच आठवड्यांची कहाणी!

ागी2’चा दमदार ट्रेलर तुम्ही पाहिलाचं. या ट्रेलरमध्ये अभिनेता टायगर श्रॉफचा अवतारही तितकाच दमदार आहे. त्याचा लूकही एकदम हटके आहे. आत्तापर्यंत तुम्ही आम्ही सगळ्यांनीच टायगरला लांब केसांमध्ये पाहिलेयं. पण ‘बागी2’मध्ये टायगरची हेअरस्टाईल अचानक बदलेली दिसतेय. कदाचित तुम्हाला माहित नसेल पण त्याच्या या लूकमागे पाच आठवड्यांची कहाणी आहे. होय, काल ‘बागी2’च्या ट्रेलर लॉन्चदरम्यान चित्रपटाचा दिग्दर्शक अहमद खान याने ही कहाणी सर्वांना ऐकवली. त्याने सांगितले की, साजिदला (‘बागी2’चा निर्माता साजिद नाडियाडवाला) या चित्रपटासाठी टायगरचे एक वेगळे लूक हवे होते. पण लूक बदलणार कसे? या विचारात आम्ही पडलो. मग साजिदलाच एक युक्ती सुचली. टायगरला केस कापायला सांग, असे त्याने मला सांगितले. पण टायगरला केस काप, हे सांगण्याची हिंमत मात्र कुणातही नव्हती. कारण टायगर त्याच्या केसांवर किती प्रेम करतो, हे सगळ्यांनाच ठाऊक होते. मग मीच हिंमत करून एकेदिवशी टायगरला ही गोष्ट सांगितली. टायगर नकार देईल, असे मला वाटले होते. पण त्याने अगदी सहज, ठीक आहे, असे म्हटले अन् माझा जीव भांड्यात पडला. आम्ही सगळे खूश झालोत. दुसºया दिवशी टायगर केस कापून आला. पण त्याने अगदीच थोडे केस कापले होते. साजिदने ते पाहिले आणि आणखी कमी कर, असे त्याला सांगितले. टायगरने पुन्हा कटिंग केली. असे करता करता, टायगरचा लूक फायनल व्हायला पाच आठवडे लागले.

ALSO READ : अनोख्या अंदाजात लॉन्च झाला ‘बागी2’चा ट्रेलर! टायगर श्रॉफचे ‘deadly stunts’ पाहून व्हाल थक्क!!

एकंदर काय तर टायगरला या चित्रपटासाठी आपल्या केसांचे बलिदान द्यावे लागले. आता त्याचे हे बलिदान किती फळास येते ते बघूच. तूर्तास टायगरचा हा लूक तुम्हाला आवडला की नाही, ते आम्हाला जरूर कळवा.  ‘बागी2’च्या ट्रेलरमध्ये टायगरचा अ‍ॅक्शन अवतार बघण्यासारखा आहे. याशिवाय  दिशा पटनीसोबतचा त्याचा रोमान्सही डोळ्यांत भरणारा आहे. मनोज वाजपेयी, रणदीप हुड्डा यांची एक झलकही या ट्रेलरमध्ये दिसते आहे. टायगरची एक एक किक, एक एक पंच पाहण्यासारखा आहे.  ‘बागी2’ हा चित्रपट येत्या ३० मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.  हा चित्रपट गतवर्षी आलेल्या ‘बागी’चा  सीक्वल आहे.  ‘बागी’मध्ये टायगरसोबत श्रद्धा कपूर दिसली होती. पण  ‘बागी2’ श्रद्धाची जागा दिशाने घेतली.  

Web Title: Tiger Shroff's changed look at 'Baggi2' is a five-week story!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.