...या आहेत बॉलिवूडच्या Dramatic Moms

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2017 19:47 IST2017-05-12T14:17:55+5:302017-05-12T19:47:55+5:30

बॉलिवूडमध्ये काही भूमिका अशा साकारल्या जातात, ज्या प्रेक्षकांच्या मनावर कायमस्वरूपी अधिराज्य करतात. मग तो खलनायक साकारणारा अभिनेता असो वा ...

... These are Bollywood's Dramatic Moms | ...या आहेत बॉलिवूडच्या Dramatic Moms

...या आहेत बॉलिवूडच्या Dramatic Moms

ong>बॉलिवूडमध्ये काही भूमिका अशा साकारल्या जातात, ज्या प्रेक्षकांच्या मनावर कायमस्वरूपी अधिराज्य करतात. मग तो खलनायक साकारणारा अभिनेता असो वा ‘आई’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री असो. हे कलाकार अशाप्रकारचे पात्र असे काही रंगवितात की, लोक त्यांना त्याच भूमिकेत बघणे पसंत करतात. ‘आई’ची भूमिका साकारताना बॉलिवूडमध्ये अशाच काही अभिनेत्री प्रसिद्धी झाल्या आहेत. प्रेक्षकांनी जेव्हा-केव्हा त्यांना पडद्यावर बघितले तेव्हा त्या आईच्याच भूमिकेत बघावयास मिळाल्या. आज आम्ही अशाच काही फिल्मी आईच्या भूमिकांविषयी तुम्हाला सांगणार आहोत...!



निरूपा रॉय
दिवारमधील ‘मेरे पास मां है’ या डायलॉगमुळे आजही निरूपा रॉय या प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. चित्रपटसृष्टीतील या आईने अनेक चित्रपटांमध्ये आईची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेतला आहे. आपल्या मुलांसाठी कुठल्याही प्रकारचे बलिदान देणारी ही आई प्रेक्षकांच्या कायमस्वरूपी स्मरणात राहील यात शंका नाही. 



राखी

‘मेरे करण अर्जुन आएंगे’ हे शब्द जरी कानावर पडले तरी, अभिनेत्री राखी यांचा चेहरा समोर येतो. ‘करण-अर्जुन’प्रमाणे अनेक चित्रपटांमध्ये आईचे पात्र साकारून त्यास जिवंत करणाºया राखी यांना बॉलिवूडमध्ये याच भूमिकेने खºया अर्थाने ओळख निर्माण करून दिली. विशिष्ट शैलीतील त्यांचे डायलॉग आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. 



रिमा लागू

९० च्या दशकातील राजश्री प्रॉडक्शनची फेमस ‘आई’ रिमा लागू आजही या प्रकारच्या भूमिका साकारत आहेत. ‘मैने प्यार किया’ या चित्रपटातील त्यांची गोड स्माइल आजही अनेकांना आठवते. या भूमिकेचा त्यांना फायदा अन् तोटाही झाल्याचे त्यांनी एकदा म्हटले होते. 



वहिदा रहमान
बॉलिवूडमधील आणखी एक ‘आई’ म्हणजे अभिनेत्री वहिदा रहमान या होत. आपल्या मुलांच्या समर्थनार्थ प्रत्येक अडचणींवर मात करण्यासाठी या आईचा लढा चित्रपटांमध्ये आपण बघत आलो आहोत. वहिदा या आईच्या भूमिकेसाठी बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध आहेत. 



जया बच्चन
‘कभी खुशी-कभी गम’ या चित्रपटात अभिनेत्री जया बच्चन यांनी ‘आई’चे पात्र साकारून आपण या भूमिकेसाठी किती परिपक्व आहोत, हेच दाखवून दिले आहे. या चित्रपटात जया आपल्या मुलांच्या आनंदासाठी त्यांच्या प्रत्येक सुखा-दु:खात सहभागी होताना बघावयास मिळाल्या. 



फरिदा जलाल
अभिनेत्री फरिदा जलाल यांना आजही बॉलिवूडमध्ये ‘सिमरन की मॉँ’ म्हणून ओळखले जाते. ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या चित्रपटाव्यतिरिक्त त्यांनी इतरही बºयाचशा चित्रपटांमध्ये ‘आई’चे दमदार पात्र साकारले आहे. अजूनही त्या अशाप्रकारच्या भूमिका साकारत आहेत. 

Web Title: ... These are Bollywood's Dramatic Moms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.