​माझ्या आयुष्यात कुठलीच मिस्ट्री वूमन नाही; खोट्या बातमीने भडकला नवाजुद्दीन सिद्दीकी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2017 14:57 IST2017-03-22T09:25:08+5:302017-03-22T14:57:14+5:30

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी सध्या जाम भडकला आहे. केवळ भडकलाच नाही तर त्याने एका फिल्मी मॅगझिनला कायदेशीर नोटीसही पाठवले आहे. ...

There is no misty woman in my life; Nawazuddin Siddiqui, the false news! | ​माझ्या आयुष्यात कुठलीच मिस्ट्री वूमन नाही; खोट्या बातमीने भडकला नवाजुद्दीन सिद्दीकी!

​माझ्या आयुष्यात कुठलीच मिस्ट्री वूमन नाही; खोट्या बातमीने भडकला नवाजुद्दीन सिद्दीकी!

िनेता नवाजुद्दीन सिद्दीकी सध्या जाम भडकला आहे. केवळ भडकलाच नाही तर त्याने एका फिल्मी मॅगझिनला कायदेशीर नोटीसही पाठवले आहे. प्रकरण आहे, नवाजुद्दीनची प्रतीमा खराब केल्याचे. म्हणजे नेमके काय झाले, ते आम्ही तुम्हाला सांगतो. या मॅगझिनच्या एका अंकात नवाजुद्दीनबद्दल एक गॉसिप छापून आले होते. ही बातमी होती, नवाजुद्दीनच्या विवाहित आयुष्यात एका दुसºया महिलेची एन्ट्री झाल्याची. नवाजुद्दीनचे लग्न धोक्यात आले आहे. कारण त्याच्या आयुष्यात एक मिस्ट्री वूमन आली आहे, असे काय काय या बातमीत लिहिले होते. 

ALSO READ : ​मी मंटो सारखा जगणार - नवाजुद्दीन सिद्दिकी

आता या बातमीने नवाजुद्दीनच्या संसारात वादळ येणे अपेक्षितच होते. झालेही तसेच. या बातमीमुळे नवाजला प्रचंड मानसिक तणावातून जावे लागले. मग काय, नवाजुद्दीनने खोटी बातमी छापणाºया संबंधित मॅगझिनलाही धडा शिकवायचा ठरवले आणि कायदेशीर नोटीस पाठवले. मी माझ्या संसारात अतिशय आनंदी आहे. माझ्या घटस्फोटाची, माझ्या अफेअरची बातमी धादांत खोटी आहे. माझ्यात आणि माझी पत्नी अंजली आमच्यात सगळे काही ठीक आहे. अंजलीने मला सुख-दु:खात सोबत केली आहे. कदाचित स्टारडम आला की सोबत अशाप्रकारच्या अफवाही येतात, असेही नवाजुद्दीनने स्पष्ट केले आहे.


नवाजुद्दीन  व  अंजली

अलीकडे नवाजुद्दीनने लग्नाच्या वाढदिवसाला पत्नी अंजलीसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. अजंली व नवाज यांना दोन मुले आहेत.
सध्या नवाजुद्दीन ‘मंटो’ या चित्रपटात व्यस्त आहे. पाकिस्तानी पटकथा लेखक सआदत हसन मंटो यांच्या आयुष्यावर हा सिनेमा बेतलेला आहे.  सआदत हसन मंटो हे एक उर्दू साहित्यिक व लघुकथाकार होते. त्यांच्या सर्व कथा भारताची फाळणी, समाजातील दारिद्रय, वेश्यावृत्ती, इत्यादी विषयांच्या आसपास फिरणाºया आहेत. लिखाणातील अश्लीलतेच्या आरोपावरून त्यांना भारताच्या फाळणीपूर्वी व फाळणीनंतर असे एकूण सहा वेळा तुरुंगातही जावे लागले, परंतु त्यांच्यावरील आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत. आपल्या ४२ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी एकूण २२ कथासंग्रह, एक कादंबरी, व इतर फुटकळ साहित्य लिहिले. 

Web Title: There is no misty woman in my life; Nawazuddin Siddiqui, the false news!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.