'रंग दे बसंती'मधून लोकप्रिय झाला होता हा अभिनेता, फ्लॉप ठरले फिल्मी करिअर, आता दिसतो असा!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 11:50 AM2023-10-18T11:50:06+5:302023-10-18T11:50:39+5:30

'रंग दे बसंती' सिनेमातून आपली बॉलिवूडमध्ये छाप उमटविणाऱ्या या अभिनेत्याचा आज वाढदिवस आहे.

The actor who became popular from 'Rang De Basanti', whose film career was a flop, is now seen! | 'रंग दे बसंती'मधून लोकप्रिय झाला होता हा अभिनेता, फ्लॉप ठरले फिल्मी करिअर, आता दिसतो असा!

'रंग दे बसंती'मधून लोकप्रिय झाला होता हा अभिनेता, फ्लॉप ठरले फिल्मी करिअर, आता दिसतो असा!

'रंग दे बसंती' (Rang De Basanti) सिनेमातून आपली बॉलिवूडमध्ये छाप उमटविणारा अभिनेता कुणाल कपूर (Kunal Kapoor) आज ४३वा वाढदिवस साजरा करतो आहे. कुणाल कपूर सध्या खूप कमी सिनेमात काम करताना दिसतो. रंग दे बसंतीशिवाय कुणालने 'लागा चुनरी में दाग', 'डियर जिंदगी' आणि 'आजा नचले' यासारख्या चित्रपटात काम केले आहे. सध्या तो इंडस्ट्रीतून गायब आहे. त्याचे लग्न बच्चन यांच्या नातेसंबंधातील मुलीसोबत झाला.  

कुणाल कपूरच्या करिअरची सुरुवात सहायक दिग्दर्शक म्हणून झाली, अमिताभ बच्चन आणि मनोज वाजपेयी यांच्या अक्समध्ये त्याने असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम केले होते. २००४ साली त्याने अभिनयात पदार्पण केलेय मीनाक्षी अ टेल ऑफ थ्री सीटीजमध्ये तो पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर झळकला. यात त्याच्यासोबत अभिनेत्री तबू होते. रंग दे बसंती त्याचा दुसरा चित्रपट आहे. यात आमिर खानसोबत तो झळकला. या चित्रपटातून त्याला खूप लोकप्रियता मिळाली. मात्र या चित्रपटानंतर तो सिनेमात फारशी कमाल दाखवू शकला नाही. त्याने एका पाठोपाठ एक लागा चुनरी में दाग, आजा नचले आणि बचना ए हसीनोमध्ये काम केले, मात्र त्याच्या कामाची फारशी दखल कुणी घेतली नाही.

या सिनेमात झळकला कुणाल कपूर
यानंतर कुणाल कपूर दोन वर्षांचा ब्रेक घेऊन २०१०मध्ये कमबॅक केले. तो राहुल ढोलकियाच्या लम्हा चित्रपटात संजय दत्त आणि बिपाशा बासूसोबत दिसला. त्याने डॉन २, लव शव ते चिकन खुराना आणि कौन कितने पानी में यासारख्या चित्रपटात काम केले. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही. 
 

Web Title: The actor who became popular from 'Rang De Basanti', whose film career was a flop, is now seen!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.