म्हणूनच आजवर आमिर खानने रेखासह सिनेमात एकत्र केले नाही काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2017 14:09 IST2017-01-17T12:18:07+5:302017-01-17T14:09:01+5:30

बॉलिवूड दिवा आणि अनेकांच्या दिलों की धडकन म्हणून अभिनेत्री रेखा यांची ओळख. त्यांच्यासह काम करण्यासाठी अनेक कलाकार एका पायावर ...

That's why Aamir Khan did not work together in the film along with Rekha | म्हणूनच आजवर आमिर खानने रेखासह सिनेमात एकत्र केले नाही काम

म्हणूनच आजवर आमिर खानने रेखासह सिनेमात एकत्र केले नाही काम

लिवूड दिवा आणि अनेकांच्या दिलों की धडकन म्हणून अभिनेत्री रेखा यांची ओळख. त्यांच्यासह काम करण्यासाठी अनेक कलाकार एका पायावर तयार असतात. जुन्या जमान्यातील नायक असो किंवा आजच्या पीढीतील नवोदित स्टार. प्रत्येक जण रेखा यांचं सौंदर्य, त्यांच्या अदा आणि त्यांच्या अभिनयावर फिदा आहे. त्यामुळेच त्यांच्यासोबत एकदा तरी काम करण्याची संधी मिळावी किंवा स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळावी अशी प्रत्येक नवोदित कलाकाराची इच्छा असते. खिलाडी अक्षय कुमारने रेखा यांच्यासह काम केले आहे. हृतिकनेही त्याच्या क्रिश सिनेमात रेखा यांच्यासह स्क्रीन शेअर केलाय. त्यांची प्रत्येक अदा आजही तितकीत घायाळ करणारी आहे. परिणिता या सिनेमातील कैसी पहेली है ये जिंदगानी म्हणत त्यांनी तरुण पीढीला अक्षरक्षा क्लीन बोल्ड केले होते. त्यामुळे प्रत्येक नवोदित कलाकाराला रेखा यांच्यासह काम करावे असे वाटते. मात्र मिस्टर पर्फेक्शनिस्ट आमिर खान याला अपवाद आहे. कारण आजवर कधीही तो रेखा यांच्यासह रुपेरी पडद्यावर झळकलेला नाही. रेखा यांच्यासह काम करण्यासाठी अनेकदा आमिरला विचारणा करण्यात आलीय. दरवेळी रेखा यांनी होकार दिला असला तरी आमिरने मात्र कधीच होकार दिला नाही.


 

मीडिया रिपोर्टनुसार आमिरचे वडील ताहिर हुसैन हे प्रसिद्ध निर्माते. त्यांनी 80च्या दशकात लॉकेट नावाचा सिनेमा बनवला होता. या सिनेमाची नायिका होत्या अभिनेत्री रेखा. मात्र यावेळी रेखा यांच्याबाबत अनेक तक्रारी असायच्या.शुटिंगसाठी सेटवर उशिरा पोहचणे, कामाला म्हणावे तितके महत्त्व न देणे, आपल्याला वाट्टेल तसे काम करणे, शेड्युल ठरलेले असताना अचानक दांडी मारणे अशा रेखा यांच्या नख-यांमुळे सिनेमाच्या शुटिंगवर परिणाम झाला. ब-याचदा अनेक सीन्सचे रिशूट करावे लागले. या सिनेमासाठी ताहिर हुसैन यांना सर्वाधिक कष्ट घ्यावे लागले होते. सगळ्या गोष्टींची जुळवाजुळव करत लॉकेट सिनेमा कसाबसा रिलीज झाला. आमिरने या सगळ्या गोष्टी जवळून पाहिल्या होत्या. याच कारणामुळे आमिरने रेखा यांच्यासह कामास नकार दिला. इतक्या वर्षांनंतरही आमिरच्या डोक्यातून ही गोष्ट जात नाही. तो काहीही विसरलेला नाही. नुकतेच दंगल सिनेमाच्या स्क्रीनिंगवेळी आमिरसह रेखा यांची झलक पाहायला मिळाली. त्यावेळी सगळ्यांना वाटले की आमिर आणि रेखा एकत्र काम करण्याबाबत चर्चा होतील. मात्र ती भेट फक्त भेटीगाठीपुरतीच मर्यादित राहिली. वडिलांना झालेला त्रास आमिरच्या डोक्यात घर करुन बसला आहे हे मात्र निश्चित.

Web Title: That's why Aamir Khan did not work together in the film along with Rekha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.