Teachers Day Special : ​आॅनस्क्रीन टीचर्स, कुणी शिकवला रोमान्सचा पाठ तर कुणी बनले फॅशन स्टेटमेंट!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2017 11:05 IST2017-09-05T05:35:10+5:302017-09-05T11:05:10+5:30

बॉलिवूडमध्ये अनेक विषयांवर चित्रपट बनतात. रोमान्स, कॉमेडी, अ‍ॅक्शन असे सगळेच. स्कूल, कॉलेज लाईफपासून तर मैत्री, प्रेमाचा पाठही अनेक चित्रपटांतून ...

Teachers Day Special: Science Sketches, Someone Written Romance, Who Made a Fashion Statement !! | Teachers Day Special : ​आॅनस्क्रीन टीचर्स, कुणी शिकवला रोमान्सचा पाठ तर कुणी बनले फॅशन स्टेटमेंट!!

Teachers Day Special : ​आॅनस्क्रीन टीचर्स, कुणी शिकवला रोमान्सचा पाठ तर कुणी बनले फॅशन स्टेटमेंट!!

लिवूडमध्ये अनेक विषयांवर चित्रपट बनतात. रोमान्स, कॉमेडी, अ‍ॅक्शन असे सगळेच. स्कूल, कॉलेज लाईफपासून तर मैत्री, प्रेमाचा पाठही अनेक चित्रपटांतून आपण शिकलो आहोत. कुठे हिरो-हिरोईन लायब्ररीत रोमान्स करताना दिसतात, तर कधी कँटीनमध्ये फाईटींग करताना आढळतात. टीचर आणि स्टुडंट या नात्यावरही बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट बनले आहेत. आज टीचर्स डे अर्थात शिक्षण दिनानिमित्त अशाच काही चित्रपटांवर आपण नजर टाकणार आहोत.

सुष्मिता सेन



आॅन स्क्रीन टीचर्स बनलेल्यांची गोष्ट करायची झाल्यास माजी मिस युनिव्हर्स सुश्मिता सेन हिचे नाव सगळ्यांत आधी घ्यायला हवे. शाहरूख खान स्टारर ‘मैं हूं ना’ या चित्रपटात सुश्मिताने केमिस्ट्री टीचरची भूमिका साकारली होती. २००४ मध्ये आलेल्या या चित्रपटात सुश्मिता इतकी ग्लॅमरस दिसली की, शाहरूखचं नाही तर सगळ्या प्रेक्षकांनाही तिने भूरळ पाडली. हा चित्रपट सुश्मिताच्या करिअरमधील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. सुश्मिताने या चित्रपटात नेसलेली साडी फॅशन स्टेटमेंट बनली होती.

शाहरूख खान



‘मोहब्बतें’ या चित्रपटातील राज आर्यन आठवतो. शाहरूखने या चित्रपटात म्युझिक टीचरची भूमिका साकारली होती. अर्थात यात म्युझिकपेक्षा शाहरूख प्रेमचं अधिक शिकवताना दिसला होता.

चित्रांगदा सिंह



अक्षय कुमार व जॉन अब्राहम यांच्या ‘देसी ब्वॉयज’ या चित्रपटातील चित्रांगदा सिंह हिची एन्ट्री विसरणे शक्यच नाहीच. यात तिने सुपर हॉट मायक्रो इकॉनॉमिक्स प्रोफेसरची भूमिका साकारली होती. या चित्रपटात चित्रांगदाचा रोल इतका ग्लॅमरस होता की, क्लासरूममधील विद्यार्थी तिचे शिकवणे सोडून तिलाच न्याहाळत बसायचे. अक्षय कुमारही तिच्या याच अदांवर भाळला होता.

करिना कपूर



करिना कपूरने ‘कुर्बान’ या चित्रपटात दिल्ली युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसरची भूमिका साकारली होती. या चित्रपटात करिनाचा लूक देसी होता. पण तरिही तिचा तो लूक प्रेक्षकांना भावला होता.

राणी मुखर्जी



२००६ मध्ये असलेल्या ‘कभी अलविदा ना कहना’ या चित्रपटात राणी मुखर्जीने एका प्रायमरी टीचरची भूमिका साकारली होती. अर्थात या चित्रपटात ती बराच वेळ क्लासरूममध्ये नाही तर शाहरूखसोबत दिसली. पण या चित्रपटातील राणीचे फॅशन स्टेटमेंट लोकांनी चांगलेच फॉलो केले होते.

शाहिद कपूर



पाठशाला या चित्रपटातील शाहिद कपूर विसरणे शक्य नाही. या चित्रपटात शाहिदने राहुल उदयावर या इंग्लिश टीचरची भूमिका साकारली होती.

सिमी गरेवाल



 ‘मेरा नाम जोकर’ हा चित्रपट आठवला की, सिमी गरेवालचा चेहरा नकळत समोर येतो. स्क्रिनवरील मोस्ट आयकॉनिक टीचर असे तिचे 
वर्णन केले तर अतिशयोक्ती होणार नाही. मिस मॅरी याच कॅरे्क्टरने ‘मेरा नाम जोकर’च्या कथेत जीव ओतला, असे म्हणणेही वावगे ठरणार नाही.



Web Title: Teachers Day Special: Science Sketches, Someone Written Romance, Who Made a Fashion Statement !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.