बिकिनी फोटोंवरून ट्रोल करणाऱ्यांना तापसी पन्नूचे रोखठोक उत्तर; म्हटले ‘टू पीस घालणे भारतीय संस्कृतीच्या विरोधात कसे?’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2017 16:26 IST2017-09-17T10:54:42+5:302017-09-17T16:26:31+5:30

काही दिवसांपूर्वी बिकिनी फोटोंवरून तापसीला ट्रोल करणाºयांना तापसीने रोखठोक उत्तर दिले आहे. वाचा सविस्तर!

Tapti Pannu's answer to trollers from Bikini photos; 'How to grind' how to fight against Indian culture? ' | बिकिनी फोटोंवरून ट्रोल करणाऱ्यांना तापसी पन्नूचे रोखठोक उत्तर; म्हटले ‘टू पीस घालणे भारतीय संस्कृतीच्या विरोधात कसे?’

बिकिनी फोटोंवरून ट्रोल करणाऱ्यांना तापसी पन्नूचे रोखठोक उत्तर; म्हटले ‘टू पीस घालणे भारतीय संस्कृतीच्या विरोधात कसे?’

ही दिवसांपूर्वी ‘जुडवा-२’ स्टार तापसी पन्नू हिने सोशल मीडियावर काही फोटोज् शेअर केले होते. फोटोमध्ये तापसी बिकिनी लूकमध्ये होती. मात्र तिचा हा बिकिनी अंदाज यूजर्सना फारसा भावला नसल्याने तिला ट्विटरवर चांगलेच ट्रोल करण्यात आले होते. आता तापसीने ट्रोल करणाºयांना सडेतोड उत्तर दिले असल्याने पुन्हा एकदा सोशल मीडियावर तापसी चर्चेत आली आहे. तापसीने म्हटले की, ‘मला ही बाब अजूनही समजली नाही की, टू पीस घालणे भारतीय संस्कृतीच्या विरोधात कसे असू शकते? आयएनएसने दिलेल्या माहितीनुसार तापसीच्या मते, मी एक भारतीय आहे आणि भारतीय असल्याचा मला अभिमान आहे. येथील परंपरा आणि वेशभूषेविषयी मी जाणून असून, ते मी फॉलो करीत आली आहे. गेल्या काही काळाचा विचार केल्यास पूर्वी छोटे ब्लाउज घातले जात असत. आज त्यास बिकिनी ब्लाउज असे म्हटले जाते. पूर्वी बिकिनी ब्लाउज घालणे विशर्प होते. मात्र आता अचानकच हे सर्व व्हल्गर आणि संस्कृतीच्या विरोधात वाटत असल्याचे तापसी म्हणाली. 

पुढे बोलताना तापसीने म्हटले की, भारतातील बहुतांश महिला आजही अशा म्हणताना बघावयास मिळतात की, ‘लोक काय म्हणतील?’ कारण चुकीचे आणि बरोबर हे लोक ठरविणार असे त्यांना वाटते. जेव्हा आपला जन्म होतो तेव्हापासूनच आपल्याला हे सांगितले जाते की, आपल्याला काय करावे आणि काय करू नये. मात्र आता यामध्ये बदल होताना दिसत आहे. परंतु लोकांना हा बदल पचविणे अवघड होत आहे. मात्र याचा कोणीच विचार करीत नाही की, आम्हाला काय अपेक्षित आहे. आता तर लोकांना हे पचविणे अवघड होत आहे की, अचानकच महिला स्वत:चे निर्णय स्वत: कसे घेत आहेत.’ वास्तविक तापसीने बिकिनी घालण्यासाठी तिच्या बॉडीवर प्रचंड मेहनत घेतली आहे. तापसी म्हणते की, ‘मी सुरुवातीपासूनच हे मानत आली की, जर तुमच्याकडे बिकिनी घालण्यासाठी बॉडी आहे आणि तुमच्यात कॉन्फिडन्स आहे, तर तुम्ही बिकिनी घालायलाच हवी. त्यात काहीही चुकीचे नाही. 
 

तापसीने काही दिवसांपूर्वीच तिचा एक बिकिनीतील फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. ब्लू बिकिनीमध्ये असलेली तापसी या अवतारात खूपच हॉट दिसत होती. तापसीचे हे फोटो ‘जुडवा-२’मधील ‘आ तो सही’ या गाण्यातील होते. या गाण्यात तापसी व्यतिरिक्त जॅकलीन फर्नांडिसही बघावयास मिळत आहे. जेव्हा तापसीने तिचे हे फोटो इन्स्टा आणि ट्विटरवर शेअर केले तेव्हा लोकांनी त्यावर कॉमेण्ट्सचा पाऊस पाडला. बºयाचशा लोकांनी तापसीच्या या बोल्ड अंदाजाचे कौतुक केले. मात्र काहींनी त्यास निगेटिव्ह कॉमेण्टही दिल्या. ट्विटरवर एका यूजर्सने तापसीच्या या लूकला कॉमेण्ट देताना म्हटले की, ‘आपल्या देशात अभिव्यक्तीचे स्वातंत्र आहे तर, हे उरलेले कपडे का परिधान केले आहेत. हेदेखील काढले असते तर बरं झालं असतं. तुझा भाऊ तुला या अवतारात बघून किती खूश आणि स्वत:वर अभिमान करीत असेल.’ यावेळी तापसीने या यूजरला त्याच्याच भाषेत उत्तर दिले होते. 

Web Title: Tapti Pannu's answer to trollers from Bikini photos; 'How to grind' how to fight against Indian culture? '

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.