तापसी पन्नूला चित्रपटात 'या' अभिनेत्रींनी केले रिप्लेस !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2017 10:22 AM2017-09-19T10:22:34+5:302017-09-19T15:52:34+5:30

जॉन लवकरच स्पॉनिश चित्रपटाताच्या रिमेक मध्ये दिसणार असल्याचे आम्ही तुम्हाला याआधीच सांगितले होते. या चित्रपटात जॉनच्या अपोझिट जुडवा 2 ...

Tapeshi Pannula film 'Revenge' done by actresses! | तापसी पन्नूला चित्रपटात 'या' अभिनेत्रींनी केले रिप्लेस !

तापसी पन्नूला चित्रपटात 'या' अभिनेत्रींनी केले रिप्लेस !

googlenewsNext
न लवकरच स्पॉनिश चित्रपटाताच्या रिमेक मध्ये दिसणार असल्याचे आम्ही तुम्हाला याआधीच सांगितले होते. या चित्रपटात जॉनच्या अपोझिट जुडवा 2 ची हिरोईन तापसी पन्नूसोबत दिसणार होती. मात्र आता जॉनसोबत तापसी या चित्रपटात दिसणार नाही आहे. 'द इन्व्हीसिबल गेस्ट' हे या स्पॅनिश चित्रपटाचे नाव आहे.  डेब्यूटेंट लक्ष्याने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. सूत्रांच्या माहितीनुसार तापसीला आता दुसऱ्या अभिनेत्रीने रिप्लेस केले आहे. तापसीची जागा आता सुशांत सिंग राजपूतची कथित गर्लफ्रेंड क्रिती सॅननने घेतली आहे. तापसीला तिच्या डेट्समुळे नाहीतर तिच्या फिसमुळे रिप्लेस करण्यात आले आहे. तापसीला या चित्रपटातून मिळणारे मानधन कमी असल्याचे वाटते म्हणून तिने हा चित्रपट नाकारला त्यानंतर यात क्रितीला घेण्यात आले.  

डीएनएच्या रिपोर्टनुसार क्रियाझ इंटरटेंमेंट, सुनैर खेतरपालबरोबर जॉन अब्राहिम या चित्रपटाचे निर्मिती करत आहे.  निर्मांत्यामध्ये चित्रपटातील अभिनेत्रीला घेऊन थोडे मतभेद झाले होते. चित्रपटाचे मालकी हक्क सुनैरकडे आहेत त्यानेच तापसीची निवड केली होती.

ALSO READ : casting couchबद्दल क्रिती सॅननने केला मोठा खुलासा!

क्रियाझ इंटरटेन्मेंटशी जोडण्याआधीच सुनैरने तापसीला चित्रपटात मुख्य भूमिका देण्याचे कबुल केले होते. जॉन ही तापसीसोबत काम करण्यास उत्सुक होता. पण क्रियाझने एन्ट्री घेतल्या घेतल्या स्टार कास्ट बदलण्याची मागणी केली त्यानंतर झालेल्या  वादानंतर क्रिती सॅननची वर्णी या चित्रपटात लागली. 
तापसी वरुण धवनसोबत जुडवा 2 मध्ये झळकणार आहे. या शुक्रवारी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट सलमानच्या जुडवाचा रिमेक आहे. यात तापसी आणि वरुणसह जॅकलिन फर्नांडिसची मुख्य भूमिका आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन डेविड धवन यांनी केले आहे. यात सलमान खानचासुद्धा कॅमिओ आहे. तर क्रितीचे गेल्या महिन्यात रिलीज झालेला बरेली की बर्फी चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट गेला. यात आयुषमान खुराना, क्रिती आणि  राजकुमार यांची रोमाँटिक कॉमेडी प्रेक्षकांना आवडली. ऐवढेच नाही तर क्रिती आगामी चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत दिसणार असल्याची चर्चा आहे. विशाल भारव्दाज याचित्रपटाची निर्मिती करणार आहे.

Web Title: Tapeshi Pannula film 'Revenge' done by actresses!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.