तमन्ना रिअल लाइफमध्ये आहे राजकुमारी,आलिशान घरात राहते हिरे व्यापा-याची लेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2018 14:37 IST2018-02-27T09:07:15+5:302018-02-27T14:37:15+5:30

हिंदीसह दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने रसिकांना वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे तमन्ना भाटिया. चित्रपटसृष्टी आणि बॉलीवुडच्या इतिहासात मैलाचा दगड ठरलेला ...

Tamanna is in real life princess, lake living in a luxurious house | तमन्ना रिअल लाइफमध्ये आहे राजकुमारी,आलिशान घरात राहते हिरे व्यापा-याची लेक

तमन्ना रिअल लाइफमध्ये आहे राजकुमारी,आलिशान घरात राहते हिरे व्यापा-याची लेक

ंदीसह दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने रसिकांना वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे तमन्ना भाटिया. चित्रपटसृष्टी आणि बॉलीवुडच्या इतिहासात मैलाचा दगड ठरलेला सिनेमा म्हणजे बाहुबली. एस. एस. राजमौली यांच्या या सिनेमात तमन्नाने अभिनेता प्रभासच्या प्रेयसीची म्हणजेच अवंतिका ही भूमिका साकारली होती. तमन्नाचा जन्म 21 डिसेंबर 1989 रोजी मुंबईत झाला.



दाक्षिणात्य सिनेसृष्टीत तमन्ना हे एक खूप मोठं नाव आहे. तिच्या सौंदर्यामुळे रसिकांनी तिला मिल्क हे नाव दिलं आहे. दक्षिणेच्या दिग्दर्शकांसोबत काम करण्यापूर्वी तमन्नाने वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी ‘चांद सा रोशन चेहरा’ या बॉलिवुड सिनेमातून अभिनयात पदार्पण केले होते. 2005 मध्ये तिने 'श्री' सिनेमातून तेलुगू सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. याचवर्षी तिचा ‘केडी’ हा सिनेमासुद्धा रिलीज झाला होता. एकामागून एक अनेक ब्लॉकबस्टर सिनेमा देणारी तमन्ना आता हिंदी चित्रपटसृष्टी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय नाव ठरले आहे.कधी कधी तिची हीच लोकप्रियता तिच्यासाठी अडचणीची ठरते.नुकतंच तिच्या एका फॅननं तिच्यावर बूटही भिरकावला होता.



तमन्ना हैदराबादच्या हिमायतनगरमध्ये एका ज्वेलरी शॉपच्या उदघाटनाला गेली होती. त्यावेळी 31 वर्षीय करिमुल्लाने दुकानातून बाहेर येणा-या तमन्नावर बूट भिरकावला. तमन्नाभोवती फॅन्सचा गराडा असल्यामुळे तो बूट एका कर्मचा-याला लागला. नारायणगुडा पोलिसांनी करिमुल्लाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. त्यावेळी गेल्या काही दिवसांत तमन्नाचे सिनेमा फ्लॉप ठरले. या सिनेमांनी निराशा केल्याने बूट भिरकावल्याचे त्याने चौकशीत कबूल केले. कलाकारांची देवाप्रमाणे पूजा करणारे आणि त्यांना डोक्यावर घेणारे फॅन दक्षिणेत आहेत. मात्र सिनेमा नाही आवडले तर तशी नाराजी व्यक्त करणारे फॅनसुद्धा तिथे आहेत हेच यानिमित्ताने समोर आलं. त्यामुळे या फॅनची निराशा होणार नाही यासाठी दक्षिणेचे कलाकार झटत असतात. तमन्नाने आजवर रसिकांचा विश्वास सार्थ ठरवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे काही अपवाद वगळल्यास तमन्नाचे सिनेमा सुपरडुपर हिट ठरलेत. त्यामुळेच फॅन तिच्यावर जीवापाड प्रेम करतात. रसिकांच्या प्रेमामुळेच तमन्ना रुपेरी पडद्याची रानी बनली आहे.केवळ पडद्यावरच नव्हे तर खासगी आयुष्यातसुद्धा तमन्ना हिरे व्यापा-याची लेक असलेली तमन्ना एखाद्या राजकुमारीसारखे आयुष्य जगते. तमन्नाचे घर तर अतिशय आलिशान आहे. तिचे घर पाहून सा-यांचे डोळे दिपून जातील. तमन्नाच्या याच आलिशान घराचे आतले फोटो खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.


 

Web Title: Tamanna is in real life princess, lake living in a luxurious house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.