ऐ जिंदगी गलें लगा लें...श्रीदेवी यांच्या कारकिर्दीतील ५ सुपरहिट चित्रपट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2018 16:21 IST2018-02-25T10:51:24+5:302018-02-25T16:21:24+5:30
अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपटसृष्टीत न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. हिंदी सिनेसृष्टीतील ९०च्या दशकातील सुपरस्टार असलेल्या ...
.jpg)
ऐ जिंदगी गलें लगा लें...श्रीदेवी यांच्या कारकिर्दीतील ५ सुपरहिट चित्रपट
अ िनेत्री श्रीदेवी यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपटसृष्टीत न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. हिंदी सिनेसृष्टीतील ९०च्या दशकातील सुपरस्टार असलेल्या श्रीदेवी यांनी वयाच्या अगदी कमी वयापासून दाक्षिणात्य सिनेसृष्टीत बाल कलाकार म्हणून काम करायला सुरुवात केली. तिने वेगवेगळया भूमिका साकारल्या आहेत. तिच्या काही चित्रपटांची झलक...
![]()
* चालबाज
रजनीकांत आणि सनी देओल यांच्यासोबत मुख्य भूमिकेत श्रीदेवी आपल्याला पाहायला मिळाल्या. एक अत्यंत साधी भोळी आणि दुसरी एकदम डॅशिंग अशा दुहेरी भूमिका त्यांनी साकारल्या होत्या. यातील भूमिका साकारलेल्या श्रीदेवी यांनी सर्वांना भूरळ घातली होती.
![]()
* सदमा
कमल हसन यांच्यासोबत श्रीदेवी यांनी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत काम पाहिले होते. त्यांनी यात मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असलेल्या युवतीची भूमिका साकारली होती. या त्यांच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक झाले.
![]()
* चांदणी
ऋषी कपूर यांच्यासोबत श्रीदेवी यांनी या चित्रपटात काम पाहिले. या चित्रपटातील त्यांच्यावर चित्रीत झालेली गाणी तुफान हिट झाले होते. मेरे हाथों मैं नौ नौ चुडीयाँ हे गाणे हिट झालं होतं.
![]()
*इंग्लिश विंग्लिश
हा चित्रपट म्हणजे श्रीदेवी यांच्यासाठी कमबॅकचा ठरला. जवळपास दीड दशकांनंतर त्यांनी या चित्रपटात काम पाहिले. यात त्यांनी इंग्लिश न येणाऱ्या महिलेची भूमिका साकारली आहे. ती तिच्या हिमतीने कशाप्रकारे इंग्लिश शिकते हे यातून उत्तमप्रकारे दाखवण्यात आले आहे.
![]()
* लम्हे
लम्हे हा श्रीदेवी यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा चित्रपट ठरला. यात त्यांनी दुहेरी भूमिका साकारल्या आहेत. आई आणि मुलीचं सुंदर नातं या चित्रपटातून प्रेक्षकांना बघायला मिळालं होतं. यातील श्रीदेवी यांची भूमिका ही खरंच खूप सुंदर होती.
![]()
* मि. इंडिया
अनिल कपूर आणि श्रीदेवी यांची क्लासिक जोडी मि.इंडिया चित्रपटात जमली होती. या चित्रपटातील त्यांच्या जोडीने अनेकांची प्रशंसा मिळवली. या चित्रपटात श्रीदेवी यांनी एका पत्रकाराची भूमिका निभावली आहे. यात ती कमालीची सुंदर दिसते.
![]()
* नगिना
श्रीदेवी यांनी या चित्रपटात रजनी ही व्यक्तिरेखा साकारली आहे. रजनी ही एक इच्छाधारी नागिन असते. यात तिने ऋषी कपूर यांच्यासोबत काम केले आहे.