तैमुरने फोटोग्राफर्सना पाहाताच दिली पोझ, हा व्हिडिओ पाहून आवरणार नाही हसू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 16:57 IST2021-06-29T16:56:29+5:302021-06-29T16:57:28+5:30
तैमुरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

तैमुरने फोटोग्राफर्सना पाहाताच दिली पोझ, हा व्हिडिओ पाहून आवरणार नाही हसू
तैमूर त्याच्या जन्मापासूनच बॉलिवूड आणि मीडियामध्ये लोकप्रिय स्टारकिड आहे. बेगम आणि नवाब तर आपल्या लाडक्या लेकाचे हट्ट पुरवण्यासाठी काहीही करायला तयार असतात. त्यामुळे तैमूरच्या बाललीला नेहमीच प्रत्येकासाठी चर्चेचा विषय ठरतो.
तैमुर मीडियात फेमस असल्याने त्याला पाहिल्यानंतर फोटोग्राफर्सचे कॅमेरे नेहमीच त्याच्याकडे वळतात. आता नुकतेच त्याला मुंबईत पाहाण्यात आले. यावेळी तर तैमुर फोटोग्राफर्सना पाहून मस्ती करत पोझ देताना दिसला.
तैमुरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालादेखील तुमचे हसू आवरणार नाही. या व्हिडिओत तैमूरचा खोडकरपणा दिसून येत आहे. तो फोटोग्राफर्संना पाहून मस्ती करताना दिसतोय. इतकंच नाही तर त्यांना पाहून तो पोझ देखील देत आहे. हे सगळे पाहून तिथे उपस्थित असलेल्या फोटोग्राफर्सना देखील त्यांचे हसू आवरत नाहीये. तैमुरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.