या दाक्षिणात्य अभिनेत्याच्या प्रेमात होती तब्बू, अद्याप नाही केले लग्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 07:15 IST2018-08-30T14:04:57+5:302018-08-31T07:15:00+5:30

तब्बू आणि एका दाक्षिणात्य अभिनेत्याची प्रेमकथा मीडियात चांगलीच गाजली होती. हा अभिनेता दक्षिणेतील सुपरस्टार असून त्याने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे

Is Tabu involved with Nagarjuna? | या दाक्षिणात्य अभिनेत्याच्या प्रेमात होती तब्बू, अद्याप नाही केले लग्न

या दाक्षिणात्य अभिनेत्याच्या प्रेमात होती तब्बू, अद्याप नाही केले लग्न

बॉलिवूडमधील अनेक नायक-नायिकांच्या प्रेमकथा आजवर गाजल्या आहेत. अशीच प्रेमकथा बॉलिवूडमधील एक अभिनेत्री आणि दाक्षिणात्य अभिनेत्याची गाजली होती. 
 
तब्बूला आज बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्रींपैकी एक मानले जाते. तिने आजवर अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. चांदनी बार, चीनी कम, अस्तित्व या सगळ्याच चित्रपटांमधील तिच्या भूमिका चांगल्याच गाजल्या आहेत. तिला आजवर अनेक पुरस्कारांनी देखील गौरवण्यात आलेले आहे. तब्बूच्या व्यवसायिक आयुष्याइतके तिचे वैयक्तिक आयुष्य देखील नेहमीच चर्चेत राहिले आहे. तब्बूने वयाची चाळीशी पूर्ण केली असली तरी अद्याप ती सिंगल आहे. 

तब्बू आणि एका दाक्षिणात्य अभिनेत्याची प्रेमकथा मीडियात चांगलीच गाजली होती. हा अभिनेता दक्षिणेतील सुपरस्टार असून त्याने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. या अभिनेत्याचे नाव नागार्जुन असून नागार्जुन आणि तब्बू यांना अनेकवेळा अनेक कार्यक्रमात देखील एकत्र पाहाण्यात आलेले होते. त्यावरूनच त्यांच्यात अफेअर असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्यावेळी नागार्जुनचे लग्न अभिनेत्री अंमलासोबत झालेले होते. नागार्जुनचे हे दुसरे लग्न होते. तब्बू आणि नागार्जुन दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते. पण नागार्जुनला त्याच्या पत्नीला सोडायचे नव्हते आणि त्यामुळे त्या दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला अशी त्यावेळी जोरदार चर्चा रंगली होती. पण या सगळ्या केवळ अफवा असल्याचे नागार्जुनची पत्नी अंमलाने एका मुलाखतीत स्पष्ट केले होते.

तब्बू दक्षिणेत असल्यावर नागर्जुनच्या घरी अनेकवेळा राहायला असायची. त्यावरून देखील मीडियात चर्चा झाल्या होत्या. त्यावर अमलाने एका मुलाखतीत सांगितले होते की, तब्बू ही माझी चांगली मैत्रीण असून तिच्याबद्दल आणि नागार्जुनबद्दल मीडियात असणाऱ्या सगळ्या चर्चा चुकीच्या आहेत. अभिनेता डॅनी डेन्झोपा यांना मी भाऊ मानते. त्यांच्यामुळेच माझी आणि तब्बूची ओळख झाली होती. तिला मी गेल्या कित्येक वर्षांपासून ओळखत आहे. त्यामुळे ती आमच्या घरी देखील अनेकवेळा राहायला येते. त्यामुळे अशा अफवा पसरण्यात काहीही अर्थ नाहीये. 

Web Title: Is Tabu involved with Nagarjuna?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tabuतब्बू