‘जग्गा जासूस’च्या रिलीज डेटबाबतचा सस्पेंस कायम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2017 20:13 IST2017-04-02T14:43:06+5:302017-04-02T20:13:06+5:30

​अभिनेता रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ स्टारर ‘जग्गा जासूस’ या चित्रपटाला जणू काही ग्रहणच लागले आहे.

Suspense suspense for release of Jagga spy! | ‘जग्गा जासूस’च्या रिलीज डेटबाबतचा सस्पेंस कायम!

‘जग्गा जासूस’च्या रिलीज डेटबाबतचा सस्पेंस कायम!

िनेता रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ स्टारर ‘जग्गा जासूस’ या चित्रपटाला जणू काही ग्रहणच लागले आहे. शूटिंगपासून ते रिलीज डेटपर्यंत हा चित्रपट लांबतच असल्याने रणबीर, कॅटच्या फॅन्सची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. सुरुवातीला हा चित्रपट ७ एप्रिल रोजी रिलीज केला जाणार असल्याचे बोलले जात होते. मात्र या तारखेत बदल केल्याने अजूनही रिलीज डेटबाबतचा उलगडा केला गेला नाही. त्यामुळे या चित्रपटाच्या रिलीजबाबतचा सस्पेंस वाढला आहे. 

जेव्हा चित्रपटाच्या रिलीजची तारीख बदलण्यात आली होती तेव्हा चित्रपटाचे दिग्दर्शक अनुराग बसू काही सीन्स रिशूट करणार असल्याचे सांगितले गेले. कारण शूट करण्यात आलेल्या काही सीन्सबाबत ते समाधानी नव्हते. त्यामुळे रिलीज डेट बदलण्यात आली होती.  



दरम्यान, कॅटरिना सध्या ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तिच्यासोबत सलमान खान आहे, तर रणबीर सध्या संजय दत्तवर आधारित बायोपिकमध्ये प्रमुख भूमिका साकारत आहे. त्यामुळे हे दोघेही ‘जग्गा जासूस’ या चित्रपटाच्या यश-अपयशाबाबत किंवा त्याच्या रिलीजबाबत फारसे उत्सुक नसतील हे मात्र नक्की! कारण चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच त्यांचे ब्रेकअप झाले होते. त्यामुळे या चित्रपटाबाबत त्यांच्यात अजिबात उत्सुकता नसल्याचे दिसून येत आहे. मात्र जेव्हा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता तेव्हा लवकरच चित्रपट रिलीज केला जाणार असल्याची अपेक्षा त्यांच्या फॅन्सकडून वर्तविली जात होती. 

असे म्हटले जात आहे की, या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान कॅटरिना गंभीरपणे जखमी झाली होती. ज्यामुळे तिला आजही डान्स करताना अडचणी येत आहेत. कॅटरिनाच्या मानेला आणि पाठीला दुखापत झाली होती. त्यावेळी बराच काळ शूटिंग थांबविण्यात आली होती. आता हा चित्रपट पडद्यावर केव्हा झळकणार, असा प्रश्न त्यांच्या फॅन्सना पडला आहे. 

Web Title: Suspense suspense for release of Jagga spy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.