​सुशांतचे का वाढले भाव?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2016 14:42 IST2016-10-18T14:38:04+5:302016-10-18T14:42:10+5:30

‘एम एस. धोनी :दी अनटोल्ड स्टोरी’ या बायोपिकमध्ये धोनीची भूमिका साकारणा-या सुशांत सिंह राजपूतचे भाव वधारले आहेत. होय, हा ...

Sushant's rising prices? | ​सुशांतचे का वाढले भाव?

​सुशांतचे का वाढले भाव?

म एस. धोनी :दी अनटोल्ड स्टोरी’ या बायोपिकमध्ये धोनीची भूमिका साकारणा-या सुशांत सिंह राजपूतचे भाव वधारले आहेत. होय, हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर सुपरहिट ठरला. चित्रपटाने १०० कोटींचा गल्ला जमवला. पण हे यश सुशांतच्या चांगलेच डोक्यात गेलेय. कारण या यशानंतर सुशांतने म्हणे, त्याच्या मानधनात मोठी वाढ केलीय. मोठी म्हणजे एकदम दुप्पट.  सुशांतला आता एका चित्रपटासाठी साडे तीन ते चार कोटी रुपए हवे आहेत. तसे खरे सांगायचे तर, एखादा चित्रपट हिट झाल्यानंतर मानधन वाढवणे, ही बॉलिवूडमध्ये अगदी सामान्य बाब आहे. सुशांतने तसे पाहता काहीही गैर केलेले नाही. पण एक गोष्ट मात्र सुशांतची नेमकी चुकतेय. ‘एम एस. धोनी :दी अनटोल्ड स्टोरी’ हा चित्रपट आपल्याचमुळे हिट झाला, असा मोठ्ठा गैरसमज सुशांत करून बसलाय. धोनीमुळे नाही तर माझ्यामुळे चित्रपट हिट झाला,   १०० कोटीच्या क्लबमध्ये सामील झाला, असे अ‍ॅटिट्यूड तो दाखवू लागला आहे. अनेक निर्मांत्यांना सुशांतचे हे अ‍ॅटिट्यूड खटकू लागले आहे. पण सुशांतवर याचा परिणाम होण्याची शक्यता कमीच आहे.  कारण ‘धोनी’मुळे ‘फटकेबाजी’ करण्याची सवय जी त्याला लागलीय!!

 

Web Title: Sushant's rising prices?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.