सुशांत सिंह राजपूत थकलायं! का?? वाचा..!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2016 16:28 IST2016-07-04T10:58:13+5:302016-07-04T16:28:13+5:30
सुशांत सिंह राजपूत आणि कृति सेनन यांच्या डेटिंगच्या बातम्या सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.कृतिने अलीकडे सुशांत व तिच्यात काहीही ...

सुशांत सिंह राजपूत थकलायं! का?? वाचा..!!
स शांत सिंह राजपूत आणि कृति सेनन यांच्या डेटिंगच्या बातम्या सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.कृतिने अलीकडे सुशांत व तिच्यात काहीही नसल्याचा खुलासा केला होता. अर्थात त्याऊपरही सुशांत व कृतीमधील यांच्या रिलेशनशिपबद्दलची चर्चा थांबलेली नाही. पण आता सुशांतनेही कृतिचाच सूर आवळत, माझ्यात व कृतीत असे काहीही नसल्याचे म्हटले आहे. एका मुलाखतीत सुशांतने याबाबत सांगितले. रिलेशनशिपबाबतच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर देऊन मी थकलोय, असे तो म्हणाला. आधी माझे वेगवेगळ्या अभिनेत्रींशी नाव जोडले गेले. यानंतर माझ्या व कृतीच्या सिनेमाचे शूटींग सुरु झाल्यावर आमच्या दोघांचे नाव जोडले गेले. या बातम्या निश्चितपणे मनोरंजक आहेत.याखेरिज यात काहीही तथ्य नाही. काही दिवसांपूर्वी मी व कृति बँकॉकमध्ये सुटी घालवत असल्याची बातमी मी वाचली. पण ती तिथे नव्हती. कृति बँकॉकमधील शूटींग संपवून मुंबईला परतल्यानंतर ती माझ्यासोबत बँकॉकला असल्याची बातमी उमटली. अशा बातम्या मुद्दाम पेरल्या जात असाव्यात. पण दुदैवाने माझ्यासंदर्भातील या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही. मी सध्या कुणासोबतही डेटिंग करत नाहीयं, असे सुशांतने स्पष्ट केले.
![]()