गर्लफ्रेंड क्रिती सॅननच्या रूमशेजारीच रूम मिळावा म्हणून सुशांत सिंग राजपूतने ‘आयफा’त घातला गोंधळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2017 21:13 IST2017-07-18T15:28:35+5:302017-07-18T21:13:49+5:30
न्यूयॉर्क येथे पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेला १० वा आयफा २०१७ सोहळा पार पडला असला तरी, त्यातील वाद आता पुढे ...

गर्लफ्रेंड क्रिती सॅननच्या रूमशेजारीच रूम मिळावा म्हणून सुशांत सिंग राजपूतने ‘आयफा’त घातला गोंधळ!
न यूयॉर्क येथे पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेला १० वा आयफा २०१७ सोहळा पार पडला असला तरी, त्यातील वाद आता पुढे येत आहेत. अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने पुरस्कार न मिळाल्याची नाराजी जाहीरपणे दाखवून दिली. त्याचबरोबर आयफातील त्याचे नखरेही आता समोर येत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार सुशांतने कथित गर्लफ्रेंड क्रिती सॅनन हिच्या रुमजवळच आपली रूम असावी या हट्टापायी आयोजकांच्या अक्षरश: नाकात दम आणला होता. आता ही बाब समोर आल्याने पुन्हा एकदा सुशांत चर्चेत आला आहे.
वास्तविक आयफामध्ये सुशांत अन् क्रितीच्या परफॉर्मन्सनी धूम उडवून दिली. दोघांमधील केमिस्ट्री उपस्थितांचे मने जिंकणारी ठरली. शिवाय संपूर्ण सोहळ्यादरम्यान दोघेही एकत्र बघावयास मिळाले. मात्र जेव्हा या दोघांना वेगळं होण्याची वेळ आली तेव्हा मात्र सुशांतचा अवतार बघण्यासारखा होता. त्याचे झाले असे की, सुशांत आणि क्रितीची व्यवस्था एका हॉटेलमध्ये करण्यात आली होती. मात्र दोघांचे रूम वेगवेगळ्या फ्लोरवर होते. बस हीच बाब सुशांतला खटकली. त्याने आयोजकांना असा काही त्रास दिला की, आयोजकांना त्याचे प्रत्येक नखरे सहन करावे लागले.
![]()
सुशांतला क्रितीच्या रूम शेजारीच त्याचा रूम हवा होता. मात्र ते शक्य नसल्याने इव्हेंट आयोजकांनी त्याची समजूत काढण्यचाा प्रयत्न केला. परंतु ऐकणार तो सुशांत कसला. त्याने आपला हट्ट कायम ठेवला. अखेर आयोजकांना माघार घेत त्याचे सर्व हट्ट पुर्ण केले. क्रितीच्या शेजारीच त्याच्या रूमची व्यवस्था केली. वास्तविक सुशांत आणि क्रितीने अद्यापपर्यंत त्यांच्यातील नाते मीडियात उघडपणे सांगितले नाही. जेव्हा-जेव्हा त्यांच्यातील नात्याविषयी विचारण्यात आले तेव्हा त्यांनी त्यांच्या नात्याला मैत्रीचे नाव दिले.
असो, आज सुशांतने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला असून, त्यामध्ये तो कोणाचा तरी हात पकडताना दिसत आहे. हा फोटो बघून असे वाटत आहे की, सुशांत लवकरच क्रितीसोबतच्या नात्याचा खुलासा करेल. शिवाय हा हात क्रितीचाच असल्याचेही बोलले जात आहे. दोघांमध्ये ‘राब्ता’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जवळीकता वाढली होती. ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात आहेत, असेच त्यांच्या देहबोलीवर दिसून येत असल्याने, लवकरच त्यांनी त्यांच्यातील नाते आॅफिशियल जाहीर करावे अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा असेल.