मला कोणाबद्दलही शंका वा तक्रार नाही...! सुशांतच्या वडिलांनी मुंबई पोलिसांना दिला होता जबाब 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 10:45 AM2020-09-03T10:45:52+5:302020-09-03T10:46:44+5:30

रिया चक्रवर्तीच्या नावाचा उल्लेखही नव्हता...

sushant singh rajput case father kk singh statement to mumbai police | मला कोणाबद्दलही शंका वा तक्रार नाही...! सुशांतच्या वडिलांनी मुंबई पोलिसांना दिला होता जबाब 

मला कोणाबद्दलही शंका वा तक्रार नाही...! सुशांतच्या वडिलांनी मुंबई पोलिसांना दिला होता जबाब 

googlenewsNext
ठळक मुद्दे  माझी कोणतीही शंका वा तक्रार नाही. मला वाटत सुशांतने आत्महत्या केली असावी,’ असे सुशांतच्या वडिलांनी या जबाबात म्हटले आहे.

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर सुशांतचे वडील के. के. सिंग यांनी पाटणा पोलिसांत अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा नोंदवला होता. यामुळे या प्रकरणाला एक वेगळी कलाटणी मिळाली होती. मात्र आता त्यांनी मुंबई पोलिसांसमोर नोंदवलेला जबाब समोर आला आहे. या जबाबात सुशांतचे वडील वेगळेच काही म्हटले आहे. त्यांच्या जबाबात रियाच्या नावाचा साधा उल्लेखही नव्हता. विशेष म्हणजे सुशांतच्या वडिलांनी सुशांतने आत्महत्या केल्याची शक्यताही व्यक्त केली होती.

‘आजतक’ने दिलेल्या वृत्तानुसार, सुशांतच्या मृत्यूनंतर मुंबई पोलिसांनी के के सिंग यांचा जबाब नोंदवला होता. या जबाबानुसार 14 जूनच्या आधी सुशांतची प्रकृती बरी नव्हती. 7 जून रोजी ते सुशांतशी बोलले होते.

काय दिला होता जबाब
‘ माझ्या मुलाने आत्महत्या का केली, मला माहित नाही. त्याने कधीच कुठल्याही प्रकारचा तणाव वा डिप्रेशनबद्दल सांगितले नाही. मला त्याच्या मृत्यूबद्दल कोणाबद्दलही तक्रार नाही. कोणावरही संशय नाही. मला वाटते सुशांतने उदास होऊन आत्महत्या केली.  सुशांत मुंडन कार्यक्रमासाठी 13 मे 2019 रोजी पाटण्याला आला होता. त्यावेळी आमची भेट झाली होती. 15 मे 2019 रोजी सुशांतचा मुंडण कार्यक्रम झाला होता. त्यावेळी तो अजिबात तणावात नव्हता.

16 मे रोजी तो मुंबईला निघून गेला. मी त्याच्याशी व्हॉट्सअ‍ॅपवर बोलायचो. तो उत्तरही द्यायचा. मी त्याला जास्त कॉल करत नव्हतो, कारण तो प्रचंड बिझी असायचा. तोच मला कॉल करायचा. तोच मला माझ्या तब्येतीबद्दल विचारपूस करायचा. सुशांतनं मला 7 जूनला कॉल केला होता. त्यावेळी मी त्याला पाटण्यास येण्याबद्दल बोललो होतो़ तुला जमत असेल, तर पाटण्याला ये. त्यावर त्याने बघतो असे म्हटले होते. माझी तब्येत चांगली नाही. तब्येत चांगली झाल्यावर येईल, असे तो म्हणाला होता.
 14 जूनला मी पाटण्यातील घरी होतो आणि त्यादिवशी 2.30 वाजता  सुशांतने आत्महत्या केल्याचे मला कळले. त्यानंतर माझी शुद्ध हरपली व मला चक्कर येऊ लागली. मी माझा भाचा नीरज सिंह आणि काही नातेवाईकांना घेऊन मुंबईला पोहोचलो. सुशांतवर विले पार्लेमध्ये 15 जून रोजी सायंकाळी 5 ते 6 वाजताच्या सुमारास सुशांतवर अंत्यसंस्कार केले. त्यानंतर मी सुशांतच्या भाड्याने घेतलेल्या वांद्रे येथील फ्लॅटवर गेलो. मी कुणाला काहीच बोललो नाही आणि विचारले ही नाही. माझ्या मुलाने आत्महत्या का केली? मला ठाऊक नाही.  माझी कोणतीही शंका वा तक्रार नाही. मला वाटत सुशांतने आत्महत्या केली असावी,’ असे सुशांतच्या वडिलांनी या जबाबात म्हटले आहे.

Web Title: sushant singh rajput case father kk singh statement to mumbai police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.