​सुरभी लक्ष्मी झाली ट्रोल! शोमध्ये ‘बीफ’ खाणे पडले महाग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2017 16:44 IST2017-09-10T10:58:53+5:302017-09-10T16:44:23+5:30

सोशल मीडियावर ट्रोल होणे आता नवी गोष्ट राहिलेली नाही. सध्या नेटिजन्सच्या ट्रोलिंगची शिकार ठरलीय ती राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री सुरभी ...

Surli Lakshmi came troll! 'Beef' in the show was expensive! | ​सुरभी लक्ष्मी झाली ट्रोल! शोमध्ये ‘बीफ’ खाणे पडले महाग!

​सुरभी लक्ष्मी झाली ट्रोल! शोमध्ये ‘बीफ’ खाणे पडले महाग!

शल मीडियावर ट्रोल होणे आता नवी गोष्ट राहिलेली नाही. सध्या नेटिजन्सच्या ट्रोलिंगची शिकार ठरलीय ती राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री सुरभी लक्ष्मी. होय, एका टीव्ह शोमध्ये बीफ खाताना ती दिसली आणि यावरून लोकांनी तिला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. 



ओणम या सणाच्या दिवशी सुरभी एका टीव्ही शोमध्ये दिसली. या शोमध्ये ती बीफ खातांना दिसली. विशेष म्हणजे याच दिवशी संध्याकाळी चिकन खातानाचा आणखी एक फोटोही सोशल मीडियावर तिने शेअर केला.



यामुळे सोशल मीडिया युजर्स चांगलेच संतापले आणि संतापलेल्या सोशल मीडिया युजर्सच्या वाईट कमेंट्सनी सुरभीचे पेज भरून गेले. युजर्सनी मर्यादा सोडून सुरभीवर टीकास्त्र सोडले. ओणमच्या दिवशी केवळ शाकाहारी जेवण केले जाते. पण ओणमच्या दिवशी प्रसारित शोमध्ये सुरभी मासांहार करताना दिसली. हे सगळे धार्मिक भावना दुखावणारे असल्याचे लोकांनी म्हटले. ‘ तुला तुझे नाव बदलायला हवे. तुझे वागणे तुझ्या नावाला शोभत नाही, असे एका युजरने लिहिले. तर ‘पुढच्यावर्षी डुक्कराचे मांस खा. ते तुला जास्त सूट करेल,’ असे दुसºयाने लिहिले. आणखी एकाने तर ‘तुला हिंदू असण्याचा काहीही अधिकार नाही,’असे सांगत सुरभीला लक्ष्य केले.
अर्थात सुरभीनेही ट्रोल करणा-या या युजर्सला तेवढ्याच स्पष्ट शब्दांत उत्तर दिले. माझ्या मुलाखतीसाठी चॅनल अनेक दिवसांपासून मागे लागले होते. मी ज्या रेस्टॉरंटमध्ये जाते, तिथेच मुलाखत घ्यायचे ठरले. मी भुकेली असते तेव्हा ताटात बीफ आहे, चिकन आहे वा पोर्क आहे, हे काहीही मी बघत नाही. मी बीफ खाल्ले हा मुद्दा नाही. ही मुलाखत ओणमच्या दिवशी टेलिकास्ट झाली, ही खरी समस्या आहे, असे तिने म्हटले. शिवाय उत्तर केरळमधील लोक ओनमच्या दिवशी मांसाहारी जेवण जेवतात, असे स्पष्टीकरणही तिने दिले.

Web Title: Surli Lakshmi came troll! 'Beef' in the show was expensive!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.