​सनी लिओनीची तान्हुली निशा अशी रमली डॅड डेनियल वेबरसोबत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2017 16:47 IST2017-08-14T11:17:19+5:302017-08-14T16:47:19+5:30

पॉर्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असा यशस्वी प्रवास करणारी अभिनेत्री सनी लिओनी हिने अलीकडे लातूरमधील निशा नावाच्या चिमुकलीला दत्तक ...

Sunny Leoni's Tanhuli Nisha is with Daniel Webber! | ​सनी लिओनीची तान्हुली निशा अशी रमली डॅड डेनियल वेबरसोबत!

​सनी लिओनीची तान्हुली निशा अशी रमली डॅड डेनियल वेबरसोबत!

र्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असा यशस्वी प्रवास करणारी अभिनेत्री सनी लिओनी हिने अलीकडे लातूरमधील निशा नावाच्या चिमुकलीला दत्तक घेतले. ही चिमुकली निशा आता निशा कौर वेबर झाली आहे. निशाला मराठीशिवाय इंग्रजी वा हिंदी येत नाही आणि सनी व तिचा पती डेनियल वेबर या दोघांना मराठी येत नाही. त्यामुळे भाषेमुळे निशासोबत संवाद साधण्यात सनी व डेनियल दोघांनाही  अडचणी येत होत्या. पण हळूहळू या अडचणी दूर होताना दिसताहेत. कारण चिमुकली निशा सनी व डेनियलसोबत चांगलीच रूळली आहे.





निशा सनी व डेनियल दोघांचीही जीव की प्राण बनली आहे. दोघेही अगदी फुलाप्रमाणे तिची काळजी घेताना दिसताहेत. विश्वास बसत नसेल तर निशाचे हे ताजे फोटो बघा. चिमुकली निशा डॅड डेनियलसोबत मस्तपैकी मस्ती करतेय. डॅडसोबत ती आऊटींगवर निघालीय. २१ महिन्यांच्या निशासोबत तिचा डॅडही अगदी लहान होऊन खेळतोय. तिच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. या फोटोंमध्ये निशाची मम्मी नाही. पण इतका प्रेम करणाºया डॅडपुढे निशाला मम्मीची आठवणही येत नसावी.



रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर निशाने आपल्या डॅडसाठी एक भेटकार्ड रंगवले होते. आपल्या मुलीची ही पहिली भेट डेनियल अभिमानाने मिरवताना दिसला होता. त्याचे काही फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले होते.
सनीने लातूरमधून निशाला दत्तक घेतल्यापासूनच अनेकांनीच तिच्या आणि डेनियलच्या या निर्णयाची प्रशंसा केली. मुख्य म्हणजे तिने या मुलीला दत्तक घेण्यापूर्वी जवळपास ११ पालकांनी तिला स्वीकारण्यास नकार दिला होता. पण, सनीने या चिमुकलीला पाहताच तिला आपलेसे करण्याचा निर्णय घेत कुटुंबाचा त्रिकोण पूर्ण केला.

Web Title: Sunny Leoni's Tanhuli Nisha is with Daniel Webber!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.