सनी लिओनीच्या बॉडीगार्डचे मानधन आहे कोटींच्या घरात, आकडा वाचून येईल तुम्हाला भोवळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2020 17:06 IST2020-06-12T17:05:31+5:302020-06-12T17:06:22+5:30
एखाद्या कार्यक्रमात सनी लिओनी पोहोचली तर तिची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची एकच गर्दी जमते. चाहत्यांच्या या जमलेल्या गर्दीतून तिचे संरक्षण करण्यासाठी तिचा बॉडीगार्ड कायम तिच्या सोबत असतो.

सनी लिओनीच्या बॉडीगार्डचे मानधन आहे कोटींच्या घरात, आकडा वाचून येईल तुम्हाला भोवळ
इंडो-कैनेडियन असलेली सनी लिओनी मुळात पॉर्नस्टार आहे. सनीने 'जिस्म २’ चित्रपटातून' बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. सनी लिओनीची गणना बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये केली जाते. 'बिग बॉसच्या ५ व्या' सीझनमध्ये सनी लिओनी सहभागी झाली होती. याच रियालिटी शोमुळे ती प्रकाशझोतात आली होती. सनी लिओनीचा फॅन फॉलोविंग खूप आहे. त्यामुळे तिला पाहण्यासाठी चाहते खूप गर्दी करतात. अशा गर्दीच्या ठिकाणी सनी लिओनीची काळजी घेण्यासाठी तिचा बॉडीगार्ड सावलीसारखा उभा असतो. सनीच्या बॉडीगार्डचे नाव आहे यूसुफ इब्राहीम. गेल्या दोन वर्षांपासून यूसुफ सनीची रक्षा करतो आहे. .
सनी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीपासून ते दोघे एकमेकांच्या संपर्कात आहेत आहेत. शिवाय २०१७ साली यूसुफला राखी बांधताना देखील त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला होता. सनीचा पती डॅनिअल वेबरसोबत देखील यूसुफचे चांगले संबंध आहेत.
दरम्यान, मीडिया रिपोर्टच्या सांगण्यानुसार सनी तिच्या बॉडीगार्डला वर्षाला तब्बल १ कोटी रूपयांचे मानधन देत असल्याचे सांगण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून सनी आपल्या कुटुंबासोबत अमेरिकेत आहे. तिला पुन्हा भारतात यायचं असल्याचं तिने सांगितले होते. मुंबईतून अमेरिकेत गेली होती याची माहिती सनीने सोशल मीडियावर दिली होती. तिने मुलांसोबतचा फोटो शेअर करत लिहिले होते की, जेव्हा तुमच्या जीवनात मुलं असतात तेव्हा तुमचे प्राधान्य बदलून जाते.
ती पुढे म्हणाली की, मी व डॅनिएल मुलांना इथे घेऊन आलो आहोत जिथे आमची मुलं कोरोना व्हायरसपासून सुरक्षित राहतील. ते म्हणजे आमचे घर लॉस अँजेलिस.मला माहित आहे की माझ्या आईनेदेखील हेच केले असते.