​ सनी लिओनीला सर्व सुपरस्टार्सनी दिला नकार! केवळ ‘या’ अभिनेत्याने दिला होकार!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2017 13:57 IST2017-09-06T08:27:42+5:302017-09-06T13:57:42+5:30

बॉलिवूड सनी लिओनीची फॅन फॉलोर्इंग जबरदस्त आहे. सनीचे चित्रपट हिट होवोत ना होवोत, पण तिच्या चाहत्यांची यादी बरीच मोठी ...

Sunny Leonei refuses to give all superstars! Only by 'this' actor! | ​ सनी लिओनीला सर्व सुपरस्टार्सनी दिला नकार! केवळ ‘या’ अभिनेत्याने दिला होकार!!

​ सनी लिओनीला सर्व सुपरस्टार्सनी दिला नकार! केवळ ‘या’ अभिनेत्याने दिला होकार!!

लिवूड सनी लिओनीची फॅन फॉलोर्इंग जबरदस्त आहे. सनीचे चित्रपट हिट होवोत ना होवोत, पण तिच्या चाहत्यांची यादी बरीच मोठी आहे. आपली पॉर्न स्टार ही ओळख मिटवत सनीने बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. अर्थात हे काम सोपे नव्हतेच. एककाळ असा होता की, बॉलिवूडचा कुठलाही अभिनेता सनीसोबत स्क्रीन शेअर करायला तयार नव्हता. होय, स्वत: सनीने याचा खुलासा केला आहे.
अलीकडे नेहा धूपियाच्या ‘नो फिल्टर नेहा’च्या दुस-या सीझनमध्ये सनी पोहोचली. यावेळी सनीने भूतकाळातील अनेक कटू आठवणी ताज्या केल्या. यावेळी सनीने एका अवार्ड शोचा अनुभव सांगितला. एकदा एका आयोजकांना कुण्या एका स्टारसोबत माझा परफॉर्मन्स हवा होता. पण त्यावेळी माझ्यासोबत परफॉर्मन्स करायला कुणीही स्टार तयार होईना. त्यावेळी केवळ चंकी पांडेने माझ्यासोबत स्टेज शो करायला होकार दिला होता. विशेषत: कुणीही अ‍ॅक्ट्रेस माझ्यासोबत काम करायला तयार नव्हती,असे तिने सांगितले.

ALSO READ : निशाला दत्तक घेताना सनी लिओनीने केली चूक; ३० दिवसांत द्यावे लागणार उत्तर!

सनीने मिशिगनच्या एका हॉट मुलाला डेट केले होते, तो किस्साही तिने सांगितला. तो मला रोज हाताने लिहलेले प्रेमपत्र द्यायचा. त्याचा तो अंदाज मला भावला होता.  ‘रोमिओ अ‍ॅण्ड ज्युलिएट’ हे नाटक पाहताना आम्ही एकमेकांना पहिल्यांदा किस केले होते. तो खूप हॉट होता. पण माझे पालक त्याचा द्वेष करायचे.   तरिही आमच्यात चांगले बॉन्डिंग होते. एकदा एका मोठ्या हॉलच्या एका कोपºयात मी त्याच्या मिठीत होते. आम्ही इंटिमेट होत असताना त्याठिकाणी माझे वडिल आले. मला त्या स्थितीत पाहून त्यांनी मला प्रचंड रागावले. ती घटना माझ्या आयुष्यातील सगळ्यांत वाईट घटना होती. यानंतर मिशिगनवरून माझे कुटुंब कॅलिफोर्नियला शिफ्ट झाले आणि तो हॉट मुलगा माझ्या आयुष्यातून गेला, तो कायमचाच, असेही सनीने सांगितले.

Web Title: Sunny Leonei refuses to give all superstars! Only by 'this' actor!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.