...या स्टार्सच्या स्टारडमला लागले गालबोट!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2017 19:12 IST2017-03-22T13:40:39+5:302017-03-22T19:12:00+5:30

बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक धुरंधर असे कलाकार आहेत. आपल्या टॅलेंटच्या जोरावर त्यांनी असा काही दबदबा निर्माण केला की, आजही त्यांच्या ...

Stalled the stars! | ...या स्टार्सच्या स्टारडमला लागले गालबोट!!

...या स्टार्सच्या स्टारडमला लागले गालबोट!!

लिवूडमध्ये एकापेक्षा एक धुरंधर असे कलाकार आहेत. आपल्या टॅलेंटच्या जोरावर त्यांनी असा काही दबदबा निर्माण केला की, आजही त्यांच्या त्या सुवर्णकाळाचे प्रेक्षक स्मरण करतात. आज स्मरण करण्याचे कारण असे की, ऐन यशाच्या काळात या स्टार्सकडून कळत-नकळत असे काही घडले ज्यामुळे त्यांच्या स्टारडमलाच गालबोट लागले. पुढे त्यांचे कलरफूल करिअर कधी ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट झाले हे कळलेच नाही. त्यातील काही स्टार्सनी स्वत:ला सावरत पुन्हा उभारी घेतली; मात्र जे स्वत:ला सावरू शकले नाहीत, ते मात्र विस्मरणात गेले आहेत. तर काही अजूनही पुन्हा उभारी घेण्याच्या प्रयत्नात आहेत. अशाच स्टार्सचा घेतलेला हा आढावा...!



संजय दत्त

अभिनेता संजय दत्त आजही सुपरस्टार आहे. परंतु त्याची जेल यात्रा त्याच्या करिअरसाठी खूपच मारक ठरली आहे. ज्यावेळी संजूबाबाला पोलिसांनी अटक केली होती, त्यावेळी त्याच्या करिअरचा ग्राफ बॉलिवूडमधील टॉपच्या अभिनेत्यांमध्ये होता. परंतु जसा तो कोर्ट कचेºयांमध्ये गुंफत गेला तसा त्याच्या करिअरवरही परिणाम झाला. पुढे ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या चित्रपटाने त्याला सावरले खरे; मात्र याच दरम्यान त्याला शिक्षा ठोठावली गेल्याने त्याच्या करिअरला उतरती कळा लागली. सध्या संजूबाबा शिक्षा भोगून बाहेर आला असून, पुन्हा एकदा ‘भूमी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये स्वत:ला सिद्ध करण्यासासाठी सज्ज झाला आहे. त्याचबरोबर त्याच्या खडतर आयुष्यावर आधारित ‘बायोपिक’ची निर्मितीही केली जात आहे. 



मनीषा कोइराला

९० च्या दशकातील पॉप्युलर अभिनेत्री मनीषा कोईराला पुढे अचानकच गायब झाली. त्याकाळी मनीषाची एक झलक पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर असायचे. ती प्रसिद्धीच्या सर्वोच्च स्थानी होती; मात्र हेच स्टारडम तिच्या डोक्यात असे काही भिनले की, ती नशेच्या आहारी गेली. ज्याचा परिणाम तिच्या करिअरवर झाला. आज मनीषा इंडस्ट्रीमधून जणू काही गायबच झाली. 



फरदीन खान
वडील फिरोज खान हयात होते तोपर्यंत ग्लॅमरसच्या दुनियेतील उभरता तारा म्हणून बघितले जाणारा अभिनेता फिरोज खान हाही सध्या इंडस्ट्रीमधून जणू काही गायबच झाला आहे. फरदीनच्या सुरुवातीच्या काळातील चित्रपटांचा विचार केल्यास तो पुढचा सुपरस्टार असेल असेही त्याच्याकडे बघितले जात होते; मात्र २०११ मध्ये त्याला नार्कोटिक विभागाने ड्रग्ज घेताना पकडले अन् त्याच्या करिअरला जणू काही गालबोटच लागले. त्याहीवेळी वडील फिरोज खान यांनीच मध्यस्थी करून त्याला सोडले होते. 



विजय राज 
बॉलिवूडमधील टॉपच्या कॉमेडियन कलाकारांपैकी एक नाव असलेला विजय राज सध्या इंडस्ट्रीमधून गायब आहे. जेव्हा त्याला यूएई पोलिसांनी ड्रग्ज घेताना रंगेहाथ पकडले होते; तेव्हापासून तो इंडस्ट्रीमधून गायबच झाला आहे. त्याच्या ऐन उभारीच्या करिअरला जणू काही फुलस्टॉप लागला असून, तो इंडस्ट्रीमधून हद्दपारच झाला आहे. 



शायनी आहुजा

अभिनेता शायनी आहुजा याने त्याच्या करिअरची अतिशय धूमधडाक्यात सुरुवात केली होती. एका पाठोपाठ एक हिट सिनेमे देणाºया शायनीच्या करिअरला ब्रेक तेव्हा लागला जेव्हा त्याच्यावर बलात्काराचा आरोप केला गेला. २००९ मध्ये त्याच्या घरात काम करणाºया मोलकरणीने त्याच्यावर हा आरोप लावला होता. त्यावेळी त्याला पोलिसांनी अटक केली होती. 



अफताब शिवदसानी

‘क्या यही प्यार है’ यासारख्या सुपरहिट सिनेमामधून इंडस्ट्रीत दबदबा निर्माण करणाºया अफताबला बॉलिवूडचा नेक्स्ट सुपरस्टार म्हणून बघितले जात होते. झी सिने बेस्ट मेल डेब्यू आणि स्टार स्क्रीन अवॉर्ड यासारख्या पुरस्कारांनी त्याला सन्मानित करण्यात आले होते; मात्र जसेही त्याला २००५ मध्ये ड्रग्जच्या आरोपाखाली जेलची वारी करावी लागली, तसे त्याच्या करिअरचा ग्राफ खाली उतरला. त्यातून तो अद्यापपर्यंत सावरलेला नाही. 

Web Title: Stalled the stars!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.