श्रीदेवींच्या पार्थिवाचा पहिला फोटो व्हायरल! अनेकांना होऊ शकतात अश्रू अनावर!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2018 16:43 IST2018-02-25T11:08:24+5:302018-02-25T16:43:02+5:30
काल शनिवारी श्रीदेवींनी दुबईत अंतिम श्वास घेतला. श्रीदेवींचे पार्थित अद्याप भारतात यायचे आहे. त्यापूर्वी श्रीदेवींच्या पार्थिवाचा पहिला फोटो समोर ...

श्रीदेवींच्या पार्थिवाचा पहिला फोटो व्हायरल! अनेकांना होऊ शकतात अश्रू अनावर!!
क ल शनिवारी श्रीदेवींनी दुबईत अंतिम श्वास घेतला. श्रीदेवींचे पार्थित अद्याप भारतात यायचे आहे. त्यापूर्वी श्रीदेवींच्या पार्थिवाचा पहिला फोटो समोर आला आहे. दुबईत शवविच्छदेन प्रक्रियेदरम्यान हा फोटो काढण्यात आलेला आहे. हा फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. अर्थात तो खरा आहे की खोटा, हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. दुबईच्या Emirates Towers या हॉटेलात श्रीदेवी यांना हृदयविकाराचा धक्का आला आणि यानंतर त्या बाथरूममध्ये बेशुद्ध होऊन पडल्या. यानंतर लगेच त्यांना दुबईच्या राशिद रूग्णालयात हलवण्यात आले. तूर्तास हॉटेलचे कर्मचारी याबद्दल काहीही बोलायला तयार नाही. या प्रकरणाच्या संपूर्ण चौकशीअंतीच श्रीदेवींचे पार्थिव त्यांच्या कुटुंबाला सोपवण्यात येणार आहे.
![]()
दुबईत श्रीदेवींचे हजारो चाहते आहेत. हे चाहते दुबई फॉरेन्सिक सेंटरबाहेर जमले. दुबईमधील कायद्याप्रमाणे कुठल्याही परदेशी नागरिकाचा अचानक मृत्यू झाला तर त्याच्या मृत्यूचा तपास केला जातो. त्यासाठी मृतदेहाचे शवविच्छेदन केले जाते. तत्पूर्वी पोलिसांना कागदोपत्री सोपस्कारही पूर्ण करावे लागतात. त्याअंतर्गत संबंधित देशाच्या दुतावासाला माहिती दिली जाते. त्यानंतर दुतावासाकडून मृत व्यक्तीचा पासपोर्ट रद्द केला जातो आणि नो आॅब्जेक्शन सर्टिफिकेट जारी केले जाते. पोस्टमॉर्टेमनंतर येणाºया अहवालात मृत्यूचे कारण नमूद केले जाते. तसेच या कागदपत्रांवर पोलिसांची मोहोर लावलेली असते. हे सगळे कायदेशीर सोपस्कार पूर्ण झाल्या नंतर श्रीदेवींचा मृतदेह मुंबईत आणता येईल. रात्री उशीरापर्यंत तो मुंबईत येईल, अशी अपेक्षा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्या सोमवारी श्रीदेवींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील.
ALSO READ : एक दुर्दैवी योगायोग! अर्जुनप्रमाणेच जान्हवीचा ‘डेब्यू’ पाहण्यासाठीही आई नाही!!
श्रीदेवींनी बालकलाकार म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. ‘कंदन करुनई’ या तामिळ सिनेमात त्या बालकलाकार म्हणून झळकली होत्या. अनेक पौराणिक सिनेमांमध्येही त्यांनी काम केले. १९९६ साली श्रीदेवी दिग्दर्शक बोनी कपूरबरोबर यांच्यासोबत लग्नबंधनात अडकल्या. लग्नानंतर श्रीदेवींनी बॉलिवूडमधून ब्रेक घेतला. पण अलीकडे ‘इंग्लिश -विंग्लिश’ आणि ‘मॉम’ या चित्रपटाद्वारे त्या पुन्हा बॉलिवूडमध्ये परतल्या होत्या. अभिनयासाठी श्रीदेवींची चर्चा झाली, त्याचप्रमाणे त्यांच्या पर्सनल लाईफमुळेही त्या चर्चेत राहिल्या.