​सोनू निगम कट्टरवाद्यांच्या निशाण्यावर! मुंबई पोलिसांना मिळाला गुप्तचर विभागाचा अहवाल!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2018 08:53 AM2018-02-05T08:53:02+5:302018-02-05T14:23:02+5:30

बॉलिवूड पार्श्वगायक सोनू निगम याच्याबद्दल एक धक्कादायक बातमी आहे. होय, सोनूच्या जीवाला धोका असल्याचे उघडकीस आले आहे. महाराष्ट्राच्या गुप्तचर ...

Sonu Nigam of fundamentalists! Mumbai Police get intelligence report !! | ​सोनू निगम कट्टरवाद्यांच्या निशाण्यावर! मुंबई पोलिसांना मिळाला गुप्तचर विभागाचा अहवाल!!

​सोनू निगम कट्टरवाद्यांच्या निशाण्यावर! मुंबई पोलिसांना मिळाला गुप्तचर विभागाचा अहवाल!!

googlenewsNext
लिवूड पार्श्वगायक सोनू निगम याच्याबद्दल एक धक्कादायक बातमी आहे. होय, सोनूच्या जीवाला धोका असल्याचे उघडकीस आले आहे. महाराष्ट्राच्या गुप्तचर विभागाने याबाबत मुंबई पोलिसांना सतर्क केले असून यानंतर सोनूच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनू निगम काही कट्टरवादी संघटनांच्या निशाण्यावर आहे. या कट्टरवादी संघटनांनी सोनूच्या हत्येचा कट रचला आहे. गुप्तचर अहवालात म्हटल्यानुसार, सार्वजनिक ठिकाणी वा कुठल्याही इव्हेंट वा प्रमोशनदरम्यान सोनूला लक्ष्य केले जावू शकते. या अहवालानंतर मुंबई पोलिस सावध झाले असून सोनूच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
 गतवर्षी सोनूने अजानवर ट्विट करून वाद ओढवून घेतला होता.  ‘मी मुस्लीम नाही, तरीही रोज सकाळी अजानमुळे माझी झोपमोड का? ही बळजबरी कधी थांबणार?’ असा सवाल सोनू निगमने  ट्विटरवर केला होता.  इस्लामची सुरुवात झाली, त्या काळात वीज नव्हती. मग एडिसननंतर हा कर्कश आवाज का?, जे लोक धर्माचे अनुयायी नाहीत, त्यांना भोंगे लावून उठवणा-या कोणत्याही मंदिर किंवा गुरुद्वारावर माझा अजिबात विश्वास नाही, असे आणखी एक ट्विटही त्याने केले होते. त्याच्या या  ट्विटवरूनच मोठे वादंग माजले होते. यानंतर कोलकात्यातील एका मौलवीने सोनूविरोधात फतवा जारी केला होता. सोनू निगमचे शिर कापणा-यास ५१ कोटी रुपए दिले जातील, असा फतवा त्याने काढला होता. याशिवाय सय्यद शाह आतेफ अली कादरी यांनी सोनू निगमचे मुंडण करून त्याला जुन्या चपलांचा हार घालणा-याला १० लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. सोनू निगमने आपला मित्र हकिम आलीम याच्याकडून आपले केस कापून घेत, मुस्लीम नेते सय्यद कादरी यांना जशास तसे उत्तर देत, कादरी यांनी आता दहा लाख रुपये तयार ठेवावेत, असे आवाहन केले होते. मात्र सोनूचे मुंडन करून त्याला जुन्या चपलांचा हार घालून रस्त्यांवरून फिरविणा-यांना दहा लाखांचे बक्षीस दिले जाईल, असे मी म्हटले होते, असे सांगून कादरी यांनी १० लाख रुपए देण्यास नकार दिला होता. 

ALSO READ : azaan issue : फतवा काढणा-यांवर सरकारने कारवाई करावी ; सोनू निगमची मागणी
 

Web Title: Sonu Nigam of fundamentalists! Mumbai Police get intelligence report !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.