​सोनू निगमही भडकला ‘ए दिल...’वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2016 12:24 IST2016-11-04T12:24:05+5:302016-11-04T12:24:30+5:30

‘ऐ दिल है मुश्किल’समारे रोज नवनवीन ‘मुश्किले’ उभी राहत आहे. काही केल्या वादविवाद या चित्रपटाची पाठ सोडेना. पाकिस्तानी कलाकारांमुळे ...

Sonu Nigam Bhadkala on 'A heart ...' | ​सोनू निगमही भडकला ‘ए दिल...’वर

​सोनू निगमही भडकला ‘ए दिल...’वर

दिल है मुश्किल’समारे रोज नवनवीन ‘मुश्किले’ उभी राहत आहे. काही केल्या वादविवाद या चित्रपटाची पाठ सोडेना. पाकिस्तानी कलाकारांमुळे वादात अडकल्यानंतर मोहम्मद रफींसंबंधी सिनेमात असणाऱ्या एका संवादामुळे त्यांचे चाहते चांगलेच भडकले. रफींचे चिरंजीव शाहिद यांनी करण जोहरने जाहीररीत्या माफी मागून हा संवाद डिलिट करावा अशी मागणी केली आहे.

त्याला समर्थन देताना सोनू निगमनेसुद्धा करणवर चांगलेच तोंडसुख घेतले. तो म्हणाला, ‘भारतीय संस्कृती ‘आदर’ करण्याचे शिकवते. परंतु आता तसे काही होताना दिसत नाही. जर एखाद्या व्यक्तीच्या वडिलांचा अपमाना होत असेल तर मुलाचा संताप होणे स्वभाविक आहे. रफीसाहेब माझ्यासाठी संगीत क्षेत्रातील वडिल आहेत. त्यामुळे मी कसा शांत राहू?’

चित्रपटात एका सीनमध्ये अनुष्का रणबीरला म्हणते की, ‘रफी गाते कम, रोते ज्यादा थे.’ सोनूने यावर उपायदेखील सुचवला. त्याने सांगितले की, ‘अशा प्रकारच्या संवादाऐवजी जर ‘रफी वहीं ना जिसके गाणे रोन वाले होते है’ असे जर म्हटले असते तर कदाचित चालले असते. नाही तर अनुष्का असे बोलल्यावर रणबीरचा डायलॉग असा पाहिजे होता की, ‘कुछ भी मत बोल. रफी साहब बहोत बडे सिंगर थे.’ थोडं भान ठेवून हा वाद टाळता आला असता.’

                          Sonu Karan

सोनूने करणच्या अनेक सिनेमांसाठी गाणे गायिले आहे. ‘कल हो ना हो’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘कभ अलविदा ना कहना’अशा अनेक प्रसिद्ध चित्रपटात सोनूचा आवाज आहे. एकेकाळी करणचा सर्वात आवडता सिंगर असणारा सोनू अलिकडे मात्र धर्मा प्रोडक्शनच्या सिनेमांत फारसा झळकत नाही. बहुधा याचाच तर त्याने राग काढला नसेल ना?

Web Title: Sonu Nigam Bhadkala on 'A heart ...'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.