Song released : ​अर्जुन कपूर अन् श्रद्धा कपूरचा ‘बारिश’ रोमान्स तुम्ही पाहिलातं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2017 14:13 IST2017-04-12T08:43:17+5:302017-04-12T14:13:17+5:30

अर्जुन कपूर आणि श्रद्धा कपूर यांच्या ‘हाफ गर्लफ्रेन्ड’ या चित्रपटाची सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे. अशात माधव(अर्जुन कपूर) आणि रिया (श्रद्धा कपूर) यांचा पावसातील रोमान्स नक्कीच पाहण्यासारखा आहे.

Song released: Arjun Kapoor and Shraddha Kapoor's 'rain' romans did you see? | Song released : ​अर्जुन कपूर अन् श्रद्धा कपूरचा ‘बारिश’ रोमान्स तुम्ही पाहिलातं?

Song released : ​अर्जुन कपूर अन् श्रद्धा कपूरचा ‘बारिश’ रोमान्स तुम्ही पाहिलातं?

्जुन कपूर आणि श्रद्धा कपूर यांच्या ‘हाफ गर्लफ्रेन्ड’ या चित्रपटाची सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे. चेतन भगत यांनी लिहिलेल्या नॉवेलच्या पानांवरचे नातेसंबंध आणि भावनांची कथा अर्जुन व श्रद्धा मोठ्या पडद्यावर जिवंत करणार आहेत. अशावेळेस रोमान्ससोबत जुने नाते असलेल्या पावसाला विसरून कसे चालेल? आम्ही बोलतोय ते, ‘हाफ गर्लफ्रेन्ड’च्या आज रिलीज झालेल्या ‘बारिश’ या गाण्याबद्दल. खरे तर सध्या गर्मीचे दिवस आहेत. अशात माधव(अर्जुन कपूर) आणि रिया (श्रद्धा कपूर) यांचा पावसातील रोमान्स नक्कीच पाहण्यासारखा आहे. सेंट्स स्टिफेंन्सची हाय सोसायटी गर्ल रिया आणि सर्वसाधारण कुटुंबातील माधव यांच्यातील रोमान्स फुलवणारे हे गाणे ऐश किंग आणि साशा तिरूपतीने गायले आहे. तनिष्क बागचीने ते कम्पोज केले आहे. 


ALSO READ : श्रद्धा कपूर आणि फरहान अख्तरच्या नात्याला हनी इराणीचा विरोध

माधव मनातल्या मनात रियावर प्रेम करू लागतो आणि मग अनेक प्रयत्नानंतर बॉस्केटबॉलच्या माध्यमातून दोघांची मैत्री होते, असे या गाण्यात दाखवले आहे. या गाण्याचे संगीत आणि यातील स्पेशल इफेक्ट्स बघण्यासारखे आहेत.
श्रद्धाने या चित्रपटात एका बिनधास्त मुलीची भूमिका साकारली आहे.  येत्या १९ मे रोजी चित्रपटगृहांत झळकणार असलेल्या या चित्रपटात श्रद्धा व अर्जुन या दोघांशिवाय रिया चक्रवर्ती सुद्धा एका महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. मोहित सूरी दिग्दर्शित हा चित्रपट लेखक चेतन भगत यांच्या ‘हाफ गर्लफ्रेन्ड’ या नॉवेलवर आधारित आहे.   या चित्रपटात एका बिहारी तरूणाची कथा दिसणार आहे.   बिहारच्या एका गावातून दिल्लीला शिकायला आलेला माधव आणि दिल्लीत राहणारी रिया यांच्यातील रोमान्स या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. चेतन भगतच्या कादंबरीवर आधारित चित्रपटात श्रद्धा प्रथमच काम करते आहे. याऊलट अर्जुनची ही दुसरी वेळ आहे. याआधी चेतन भगतच्या एका नॉवेलवर आधारित ‘२ स्टेट्स’मध्ये अर्जुन दिसला होता. 



 

Web Title: Song released: Arjun Kapoor and Shraddha Kapoor's 'rain' romans did you see?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.