सोनम कपूरच्या लग्नात भाव खाऊन गेली ‘ती’,लवकरच बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2018 15:35 IST2018-05-09T10:05:02+5:302018-05-09T15:35:19+5:30

बी-टाऊन असो किंवा मग सोशल मीडिया प्रत्येक ठिकाणी स्टार किड्सची जोरदार चर्चा ऐकायला मिळते.आपल्या पालकांपेक्षा 'हम भी कुछ कम ...

Sonam Kapoor's wedding announces 'she', will soon debut in Bollywood? | सोनम कपूरच्या लग्नात भाव खाऊन गेली ‘ती’,लवकरच बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण ?

सोनम कपूरच्या लग्नात भाव खाऊन गेली ‘ती’,लवकरच बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण ?

-टाऊन असो किंवा मग सोशल मीडिया प्रत्येक ठिकाणी स्टार किड्सची जोरदार चर्चा ऐकायला मिळते.आपल्या पालकांपेक्षा 'हम भी कुछ कम नहीं' असं दाखवून देणारे अनेक स्टार किड्स सध्या चर्चेत आहेत.जान्हवी कपूर, सुहाना खान, अनन्या पांडे, आर्यन खान असे बड्या बड्या स्टार कलाकारांची मुलं सध्या जोरदार चर्चेत आहेत.या स्टार किड्सचे फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होत असतात.दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची कन्या जान्हवी कपूर लवकरच बॉलिवूडमध्ये एंट्री करणार आहे.याच यादीत आता आणखी नव्या नावाच भर पडली आहे. हे नाव म्हणजे शनाया कपूर. ही शनाया म्हणजे अभिनेत्री सोनम कपूरची चुलत बहिण. बॉलिवूडचा अभिनेता संजय कपूर याची लाडकी लेक म्हणजे शनाया कपूर.चुलत बहिणीपेक्षा सौंदर्यांत कुठेही कमी नसलेली शनाया अचानक साऱ्यांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली.याला निमित्त ठरले ते सोनम कपूरचा विवाह सोहळा. या सोहळ्यातील शनायाचं सौंदर्य, तिचा अंदाज भलताच भाव खाऊन गेला. सोनम आणि आनंद आहुजा यांच्या लग्नसोहळ्यात शनाया ग्लॅमरस अंदाजात अवतरली. 18 वर्षीय शनाया कपूरने सोनमच्या लग्नात लेंहगा आणि गोल्डन रंगाचा ब्लाऊज परिधान केला होता.तिचा हा अंदाज भलताच भाव खाऊन गेला.अभिनेता संजय कपूर आणि महीप कपूर यांची शनाया ही लेक आहे.चुलत बहिण सोनमप्रमाणेच फॅशनिस्टा अशी शनाया कपूरची ओळख आहे. आपली फॅशन, स्टाईल याबाबत शनाया बरीच सजग असते. कुठेही बाहेर जाताना आपली ड्रेसिंग स्टाईल,फॅशन याची शनाया विशेष खबरदारी घेते. बॉलिवूडचे इव्हेंट्स,पार्ट्या आणि पुरस्कार सोहळ्यांमध्ये शनाया पाहायला मिळते.स्टार किड असूनही शनायाल स्वतःला कॅमेऱ्यापासून दूर ठेवते.मात्र सोनमच्या लग्नाच्या निमित्ताने शनायाचा ग्लॅमरस अंदाज साऱ्यांनी पुन्हा एकदा अनुभवला. हा अंदाज, अदा आणि सौंदर्य पाहून वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत शनाया कपूरसुद्धा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चा सध्या रंगल्याचे पाहायला मिळत आहे.   

Also Read: रिसेप्शन सोनम कपूरचे पण चर्चेचा विषय ठरले रणबीर कपूर आणि आलिया भट्ट!
 

Web Title: Sonam Kapoor's wedding announces 'she', will soon debut in Bollywood?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.