​एका ‘स्मार्ट’ उत्तराने सोनम कपूरचे झाले हसे! वाचा, युजर्सच्या मजेशीर कमेंट्स!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2018 12:42 IST2018-04-10T07:12:11+5:302018-04-10T12:42:48+5:30

सध्या सगळ्यांचे लक्ष सोनम कपूरच्या लग्नाकडे लागले आहे. बॉयफ्रेन्ड आनंद अहुजासोबत सोनम लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या बातम्या आहेत.  येत्या ...

Sonam Kapoor smiles with a 'smart' answer Read, Users' Interesting Comments !! | ​एका ‘स्मार्ट’ उत्तराने सोनम कपूरचे झाले हसे! वाचा, युजर्सच्या मजेशीर कमेंट्स!!

​एका ‘स्मार्ट’ उत्तराने सोनम कपूरचे झाले हसे! वाचा, युजर्सच्या मजेशीर कमेंट्स!!

्या सगळ्यांचे लक्ष सोनम कपूरच्या लग्नाकडे लागले आहे. बॉयफ्रेन्ड आनंद अहुजासोबत सोनम लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या बातम्या आहेत.  येत्या ९ ते १२ मेदरम्यान  स्वित्झर्लंडच्या मॉन्ट्रो शहरात सोनम व आनंद लग्न करणार, अशी खबर आहे. पण आजची ताजी बातमी सोनमच्या लग्नाबद्दल नाही तर वेगळीच आहे. होय, सोनमला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. अनेकांनी तिला आलिया भट्टच्या रांगेत नेऊन बसवले आहे. आता आलिया भट्टच्या रांगेत म्हणजे, तुम्हाला थोडा अंदाज आलाच असणार. आता हा काय मामला आहे, हे आम्हीचं तुम्हाला सांगतो. तर त्याचे झाले असे की, फिल्मफेअर मॅगझिनचे संपादक जितेश पिल्लईने गणिताशी संबंधित एक पझल  ट्विटरवर टाकला. दिलेल्या आकृतीत किती त्रिकोण आहे, असा सवाल त्यांनी केला.




सोनम कपूरने पिल्लर्इंच्या या प्रश्नाला लगेच  ‘सात’ असे उत्तर दिले आणि याच उत्तराने तिचे हसे झाले. सोशल मीडियावर ती चांगलीच ट्रोल झाली. लवकरच सोनमला आपली चूक उमगली. तिने परतून एकट्वीट  केले. ‘मी घाईघाईत ट्वीट केले. मी चूक आहे, मला माहित होते. पण अद्यापही मला याचे उत्तर ठाऊक नाही,’ असे तिने लिहिले. तिच्या उत्तरावर एका युजरने तिची आणखी फिरकी घेतली.



ALSO READ : सोनम कपूरने लग्नासाठी केली 'या' जगातील महागड्या शहराची निवड

‘उर्वरित ११ त्रिकोण तुला दिसले असते तर तू इन्फोसिसमध्ये बसून कोडिंग करताना दिसली असती. तू एकदम योग्य प्रोफेशन निवडलेस,’ असे या युजरने लिहिले. अन्य युजरही सोनमची  खिल्ली उडवताना दिसले. काहींनी तिची तुलना राहुल गांधीसोबत केली. काहींनी आलियासोबत. एकंदर काय तर घाईघाईत स्मार्ट बनण्याच्या नादात सोनमचे चांगलेच हसे झाले. आता सोनम यातून काय बोध घेते ते बघूच.

Web Title: Sonam Kapoor smiles with a 'smart' answer Read, Users' Interesting Comments !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.